खत खरेदीसाठी विचारतात जात, विरोधक संतप्त; उल्लेख वगळण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 05:34 AM2023-03-11T05:34:04+5:302023-03-11T05:35:07+5:30

खताच्या ऑनलाईन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना जात विचारल्याचे संतप्त पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले.

caste asked to buy fertilizer the opposition is angry Chief Minister eknath shinde request to the Center to omit the mention | खत खरेदीसाठी विचारतात जात, विरोधक संतप्त; उल्लेख वगळण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

खत खरेदीसाठी विचारतात जात, विरोधक संतप्त; उल्लेख वगळण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

googlenewsNext

मुंबई : खताच्या ऑनलाईन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना जात विचारल्याचे संतप्त पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. विरोधकांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत सरकारला जाब विचारला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविल्याचे सांगितले.

 सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित करत जातीवाद निर्माण करणाऱ्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. शेतकरी हीच आमची जात आहे. खत खरेदीसाठी जात का विचारताय असा सवाल त्यांनी तसेच जयंत पाटील यांनी केला.

जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये, असेही अजित पवार यांनी खडसावून सांगितले. शेतकऱ्यांना जात सांगण्याची गरज नसल्याची स्पष्टोक्ती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या प्रोग्रामिंगमध्ये कदाचित अनवधानाने ही माहिती समाविष्ट झाली असेल, असे ते म्हणाले.

पॉस मशिन...
खतांची ऑनलाइन विक्री करण्याचे आदेश सरकारने दिले. शेतकऱ्यांना खत हवे असेल तर पॉस मशीनवर संपूर्ण माहिती भरूनच विक्री करावी लागते. 
त्यानंतर अंगठ्याचा ठसा उमटवावा लागतो. आता ही माहिती भरत असतानाच खताची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याची जात कोणती ही माहितीही भरावी लागत आहे.

बदल करण्याची सूचना करू :  शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी रासायनिक खत खरेदी करताना ऑनलाईन माहिती भरली जात आहे. हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे असून यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार करुन यात बदल करण्याची सूचना करणार आहे. 

पवार यांनी मांडले आकडे
अजित पवार यांनी शेतकरी आत्महत्येचे आकडे समाेर ठेवले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (२०१४ ते २०१९) असताना ५,०६१ तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १,६६० शेतकरी आत्महत्या झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात १,०२३ आत्महत्या झाल्या.

कर्ज २ कोटी, व्याज ८ कोटी : अशोक चव्हाण
नांदेड जिल्ह्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून घेतलेल्या २ कोटी रुपयांच्या कर्जावर आता ८ कोटींचे व्याज लागले असून शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली आहे. हे कर्ज व व्याज तातडीने माफ करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. पाण्यासाठी सोसायटीने कर्ज घेतले होते. मात्र पाणीच मिळाले नाही. 

ही धक्कादायक बाब 
शेतकऱ्यांना रासायनिक खते खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये जात नमूद करावी लागत आहे. ही धक्कादायक बाब असून, यापूर्वी असे घडले नव्हते.     
शरद पवार

शेतकऱ्याला जात नसते, सर्वांना अन्न पुरवणारा तो अन्नदाता आहे परंतु खत खरेदी करताना जात विचारली जात आहे हे दुर्दैव आहे. भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. 
नाना पटोले

सरकार वर्णभेदासाठी किती आग्रही आहे हे सरकारच्या भूमिकेतून दिसते.
जयंत पाटील

Web Title: caste asked to buy fertilizer the opposition is angry Chief Minister eknath shinde request to the Center to omit the mention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.