शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

खत खरेदीसाठी विचारतात जात, विरोधक संतप्त; उल्लेख वगळण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 5:34 AM

खताच्या ऑनलाईन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना जात विचारल्याचे संतप्त पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले.

मुंबई : खताच्या ऑनलाईन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना जात विचारल्याचे संतप्त पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. विरोधकांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत सरकारला जाब विचारला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविल्याचे सांगितले.

 सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित करत जातीवाद निर्माण करणाऱ्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. शेतकरी हीच आमची जात आहे. खत खरेदीसाठी जात का विचारताय असा सवाल त्यांनी तसेच जयंत पाटील यांनी केला.

जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये, असेही अजित पवार यांनी खडसावून सांगितले. शेतकऱ्यांना जात सांगण्याची गरज नसल्याची स्पष्टोक्ती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या प्रोग्रामिंगमध्ये कदाचित अनवधानाने ही माहिती समाविष्ट झाली असेल, असे ते म्हणाले.

पॉस मशिन...खतांची ऑनलाइन विक्री करण्याचे आदेश सरकारने दिले. शेतकऱ्यांना खत हवे असेल तर पॉस मशीनवर संपूर्ण माहिती भरूनच विक्री करावी लागते. त्यानंतर अंगठ्याचा ठसा उमटवावा लागतो. आता ही माहिती भरत असतानाच खताची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याची जात कोणती ही माहितीही भरावी लागत आहे.

बदल करण्याची सूचना करू :  शिंदेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी रासायनिक खत खरेदी करताना ऑनलाईन माहिती भरली जात आहे. हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे असून यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार करुन यात बदल करण्याची सूचना करणार आहे. 

पवार यांनी मांडले आकडेअजित पवार यांनी शेतकरी आत्महत्येचे आकडे समाेर ठेवले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (२०१४ ते २०१९) असताना ५,०६१ तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १,६६० शेतकरी आत्महत्या झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात १,०२३ आत्महत्या झाल्या.

कर्ज २ कोटी, व्याज ८ कोटी : अशोक चव्हाणनांदेड जिल्ह्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून घेतलेल्या २ कोटी रुपयांच्या कर्जावर आता ८ कोटींचे व्याज लागले असून शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली आहे. हे कर्ज व व्याज तातडीने माफ करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. पाण्यासाठी सोसायटीने कर्ज घेतले होते. मात्र पाणीच मिळाले नाही. 

ही धक्कादायक बाब शेतकऱ्यांना रासायनिक खते खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये जात नमूद करावी लागत आहे. ही धक्कादायक बाब असून, यापूर्वी असे घडले नव्हते.     शरद पवार

शेतकऱ्याला जात नसते, सर्वांना अन्न पुरवणारा तो अन्नदाता आहे परंतु खत खरेदी करताना जात विचारली जात आहे हे दुर्दैव आहे. भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. नाना पटोले

सरकार वर्णभेदासाठी किती आग्रही आहे हे सरकारच्या भूमिकेतून दिसते.जयंत पाटील

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी