शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
5
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
6
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
7
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
8
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
9
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
10
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
11
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
12
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
13
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
14
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
15
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
16
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
17
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
18
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
19
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
20
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट

सर्किट बेंचसाठी मुख्य न्यायाधीशांना साकडे

By admin | Published: February 07, 2016 1:05 AM

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ लवकर व्हावे, अशी मागणी येथील वकिलांच्या शिष्टमंडळाने उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ लवकर व्हावे, अशी मागणी येथील वकिलांच्या शिष्टमंडळाने उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरमाणी यांच्याकडे निवेदनाद्वारे शनिवारी केली. यावर न्या. ताहिलरमाणी यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दरम्यान, रविवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीच्या उद्घाटन समारंभाकडे वकील बांधव पाठ फिरविणार आहेत.रविवारी होणाऱ्या इमारतीच्या उद्घाटनासाठी प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. विजया ताहिलरमाणी यांच्यासह न्या. रणजित मोरे आणि न्या. महेश सोनक यांचे शनिवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. कोल्हापुरात सहा जिल्ह्यांसाठी प्रथम सर्किट बेंच स्थापन करावे या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रभारी मुख्य न्यायाधीशांची तेथे भेट घेतली. या वेळी राजेंद्र चव्हाण यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ खंडपीठ प्रश्नासाठी लढा सुरू आहे. सर्किट बेंचबाबत राज्यातील तत्कालीन सरकारने खंडपीठ व्हावे, असा ठराव करून दिला होता. त्यामुळे आपण सर्किट बेंच होण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. शिष्टमंडळात अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. माणिक मुळीक, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. रवींद्र जानकर, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील आदींचा सहभाग होता. बहिष्कार मागे घ्यान्या. ताहिलरमाणी यांची भेट घेतल्यानंतर सर्व वकील बाहेर आले. त्या वेळी शासकीय विश्रामगृहावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांच्यासह वकिलांनी भेट घेतली. त्या वेळी डॉ. सैनी व देशपांडे यांनी रविवारचा बहिष्कार मागे घ्या, अशी त्यांना विनंती केली. मात्र, त्यावर वकिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.