शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

अंबाजोगाई येथील लेणी दुलर्क्षित

By admin | Published: November 02, 2016 12:48 PM

मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे.

महेश चेमटे, ऑनलाइन लोकमतबीड, दि. २ -  मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. भौगोलिक परिस्थितीने सुसज्ज असल्याने इतिहासात सातवाहन, चालूक्य, यादव, बहामनी, राष्ट्रकूट घराण्यांचे अंबाजोगाई आणि पर्यायाने बीडमध्ये प्रस्थ होते. राष्ट्रकूट काळात कर्नाटक, आंध्रप्रदेशात व्यापारासाठी अंबाजोगाई शहराचा वापर होत असे. याच्या खुणा येथील डोंगरात लेण्यांच्या रुपात पाहायला मिळतात. मात्र या लेण्यांची माहिती वा नोंद देखील राज्य पुरातत्व विभागाकडे नसल्याची धक्कादायक माहिती सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ.अनिता राणे-कोठारे यांनी दिली. अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सीमेजवळील जयंती नदीच्या काठी तीन लेणी सापडतात. त्यात २ शैव आणि एक जैन प्रकाराच्या लेणी आहेत. त्यातील शैव लेणी ही लेणी ‘हत्तीखाना’ म्हणून ओळखला जातो. बहामनी काळात हत्ती पाणी पिण्यासाठी या जागेचा वापर करत असे. पर्वताच्या उतारावरील ही लेणी पाहता पुण्यातील पाताळेश्वर लेण्यांची आठवण येते. तीन लेण्यांपैकी एक शैव लेणी काळाच्या पडद्याआड गेली असून; एक जैन आणि एक शैव लेणी तुर्तास तरी पाहण्याजोगे असल्याचे कोठारी यांनी सांगितले. शैव लेणीमध्ये सभामंडप, एका कातळात कोरलेला नंदी मंडप दिसून येतो. गर्भगृहाबरोबर वास्तव्य करण्यासाठी ३ खोल्या देखील आहेत. चार ओळींमध्ये आठ खांबावर (३२ खांब) लेण्यांचा भार आहे. लेण्यांसमोरील मोकळ्या जागेत मोठ्या पाषणातील चार हत्ती आहेत. चार ही बाजूने प्रवेश करता येण्याजोगे नंदीमंडप येथील आकर्षण ठरते. शेजारील तुटलेला ध्वजस्तंभ गतवैभवाची आठवण करुन देतो. सप्तमात्रिका, तांडव करणारा शिव, महिषासूरमर्दिनी, भैरव, वामन अवतार, त्रिविक्रम, नरसिंह आणि शेषशाही विष्णू यांची शिल्पे पाहताना एलोरा येथील शिल्पांची जाणीव होते. वास्तू दुलर्क्षित असल्याने शिल्पांना मोकळ्या श्वासाची गरज असल्याचे मत कोठारी यांनी व्यक्त केले.

जैन धर्माच्या इतिहासाची ओळख करुन देणारी लेणी येथे दिसून येते. लेण्यांच्या तीन बाजूस मोकळ्या जागेत मोठे मंडप आहेत. मंडपात पूजा करण्यासाठी जैन तीर्थंकरांची कोरलेली शिल्पे आहेत. मंडपात काळ्या पाषाणात एकाच लांबीचे दोन कोरलेले हत्ती आहेत. त्यांपैकी एक हत्ती अपूर्णावस्थेत दिसून येतो. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याने वा अनुदान न मिळाल्याने ती अपूर्ण राहिल्याचे मत लेणी अभ्यासकार आणि जाणकार नोंदवतात. लेण्यांच्या उजव्या बाजूला तीर्थंकर तर डाव्या बाजूला पार्श्वनाथ यांचे भग्नावशेष दिसून येतात. जयंती नदीच्या पुरामुळे यांची हानी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.मंडपात १३ जैन तीर्थंकर, पार्श्वनाथ यांची बैठी प्रतिकृती, उभे तीर्थंकर लेण्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्याच बरोबर काताळात मोठ्या प्रमाणात कोरीव काम केल्याचे दिसते. किंबहूना राष्ट्रकुट काळातील व्यापार व्यवस्थेचे चित्रण काताळात रेखाटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. शिवाय चौमुख, चौरी घेतलेल्या स्त्रीचे शिल्प, हार घेतलेल्या विद्याधराचे शिल्प, शिरविरहीत स्त्रीची शिल्पेदेखील आहेत. घोड्यावरील पुरुषांसह विषम संख्येतील स्त्री-पुरुष व्यापार करत असल्याचे तर्क जाणकार लावतात. लातूरमध्ये या लेण्याची साधर्म्य असणारी ‘खरोसा’ची लेणी आहे, असे कोठारी यांनी सांगितले.