शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का, मुलगी आणि सुनेवर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 11:33 AM

छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये आज या संदर्भात बोलताना माझी स्क्रिप्ट शरद पवार लिहून देत नव्हते आणि आताही अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले. 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) चांगलाच झटका दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत पुन्हा एक मोठी बातमी समोर आलीये. केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या क्लीनचीट अहवालाची माहिती लीक केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात पूजा यांच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूजा यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागासोबत कट रचला होता. त्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाल देण्यासाठी लाच देण्याची योजना केली होती. २९ऑगस्ट २०२१ रोजी हा अहवाल माध्यमांमधून लीक झाला होता.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर सीबीआयने चौकशी केली होती. त्याच प्रकरणात क्लीन चिट अहवाल हा लीक झाला होता. त्यामुळे सीबीआय अहवाल लीक प्रकरणात अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक केली होती.

काय होते प्रकरण?मुंबईते तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा हा आरोप होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजा यांनी लीक केल्याचा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असे म्हटले असल्याचा दावा करण्यात आला. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभाग