शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

सीबीआय तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर; आठ दिवसांचा मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 5:38 AM

दिल्लीच्या गंगाधरलाही लातुरात आणणार

राजकुमार जोंधळे 

लातूर - नीटमध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे दाेघे सीबीआय काेठडीत असून, दाेन्ही आराेपींसह इतर संशयितांच्या चाैकशीत तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर आहे. अटकेतील आराेपींच्या काेठडीची मुदत शनिवारी संपत असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात दिल्लीच्या गंगाधरलाही लातुरात आणले जाणार असल्याची माहिती समाेर आली आहे.

नीट गुणवाढीच्या संदर्भाने लातुरात दाखल गुन्ह्याचा तपास सीबीआयकडून केला जात असून, पथक आठ दिवसांपासून मुक्कामी आहे. चाैकशीतून अनेक धागेदाेरे समाेर येत आहेत. काेठडीतील आराेपींशी काेणाकाेणाचा संपर्क आला आहे, ते आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. चाैकशीत आराेपींचा आकडा वाढण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.

सीबीआयच्या एका पथकाकडून तपास...

सीबीआयच्या एकाच पथकाने काेठडीतील आराेपींची कसून चाैकशी केली असून, त्यांच्या हाती महत्त्वाचे धाेगेदाेरे लागले आहेत. यात तिघा संशयितांची नावे समाेर आल्याने ते चाैकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता हाती लागलेल्या यादीतील पालकही रडारवर आहेत.

‘टीईटी’ परीक्षेतही गोंधळ; बड्या अधिकाऱ्यांशी लिंक

नीटसह इतर परीक्षांमध्येही गैरप्रकार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना असून, टीईटी परीक्षेतील धागेदाेरे हाती आले आहेत. यातील बड्या अधिकाऱ्यांशी काहींची ‘लिंक’ असल्याचेही समाेर आले आहे. या ‘लिंक’चा शाेध सीबीआयकडून घेतला जात आहे.

चौकशीत अनेकांची कुंडली लागली हाती

आठ दिवसांच्या चाैकशीत अनेकांची कुंडली सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती समाेर आली आहे. आराेपींनी केलेले आर्थिक व्यवहार, संपर्कातील व्यक्ती आणि संशयास्पद नावे, पालकांची यादीच समाेर आल्याने त्यांचीही चाैकशी केली जाणार आहे.

स्थानिक यंत्रणेची तपासासाठी मदत

या गुन्ह्याचा प्राथमिक तपास स्थानिक पाेलिसांनी केला. चाैकशीदरम्यान तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून एक-एक धागा उकलण्याचे काम सीबीआय पथकाकडून करण्यात येत आहे. मध्यस्थ असलेला इरण्णा आणि दिल्लीतील गंगाधरच्या कारमान्याचा उलगडाच काेठडीतील आराेपींकडून झाल्याचे समाेर आले आहे.

पळालेल्या इरण्णाचा सीबीआयलाही गुंगारा

लातुरात गुन्हा दाखल गुन्ह्यातील चारपैकी इरण्णा काेनगलवार हा गुंगारा देत पसारच आहे. ताे पाेलिसांच्याही हाती लागला नाही. आता सीबीआयच्या पथकांनाही ताे चकवा देत असून, त्याच्या अटकेसाठी सीबीआयची पथके मागावर आहेत.

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकCBIगुन्हा अन्वेषण विभाग