- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती यांच्याबरोबरच आयएनएक्स मीडियाचे इंद्राणी व पीटर मुखर्जी यांचे मुंबईतील वरळी येथील निवासस्थान तसेच कार्यालयांवर सीबीआयने मंगळवारी छापे टाकले. संबधित ठिकाणी रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती. त्याचा अधिकृत तपशील समजू शकलेला नाही.इंद्राणी व पीटर मुखर्जी यांच्याविरुद्ध केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय) आर्थिक गैरव्यवहार व बनावट कागदपत्रे व फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हे दाखल केले. इंद्राणी मुखर्जीने २००७ मध्ये आयएनएक्स मीडिया आणि आयएनएक्स न्यूज या कंपन्या स्थापन केल्या होत्या. त्याशिवाय न्यूज एक्स, ९ एक्स आणि ९ एक्स म्युझिक या कंपन्यांशी ते संलग्न होते. एअरसेल-मॅक्सिस यांच्या साडेतीन हजार कोटी रुपयांच्या व्यवहारास परकीय गुंतवणूक वृद्धी मंडळाद्वारे (एफआयपीबी) मंजुरी दिल्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी हे छापे मारले. एअरसेल-मॅक्सिसच्या व्यवहारात ६०० कोटींची मान्यता देण्यासंबंधी अर्थमंत्र्यांना अधिकार असताना चिदंबरम यांनी या मर्यादेचे उल्लंघन करून साडेतीन हजार कोटींच्या व्यवहाराला मान्यता दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
इंद्राणी, पीटर मुखर्जीच्या घरावर सीबीआय छापे
By admin | Published: May 17, 2017 12:45 AM