मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा गुरुवार, ९ मार्चपासून देशभरात सुरु होणार आहेत. देशभरातील एकूण ३ हजार ९७६ केंद्रावर दहावीची तर १ हजार ६७८ परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे बोर्डातर्फे जाहीर करण्यात आले आहे. राज्याचा समावेश असलेल्या चेन्नई विभागातून एकूण ६४९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १ हजार ६७८ शाळांतील विद्यार्थ्यांनी नावे नोंदविली असून ३ हजार ५०२ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी स्कूल बेस आणि बोर्ड बेस या दोन विभागात परीक्षा घेण्यात येणार आहेत. स्कूल बेस परीक्षेसाठी ७ लाख ८१ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. देशभरातून एकूण ६ हजार ७७२ दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहे. यात दहावीच्या परीक्षेसाठी ४ हजार २७५ तर बारावीसाठी २ हजार ४९७ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)८ लाख विद्यार्थीबोर्ड बेस परीक्षेसाठी ८ लाख ८६ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यात एकूण ५ लाख १५ हजार ९८१ मुले आणि ३ लाख ७० हजार ६१५ मुलींचा समावेश आहे. तर स्कूल बेस परीक्षेसाठी ४ लाख ७३ हजार ३३९ मुले आणि ३ लाख ८ हजार १२४ मुली अशा एकूण ७ लाख ८१ हजार ४६३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर बारावीसाठी ६ लाख ३८ हजार ८६५ मुले आणि ४ लाख ६० हजार २६ मुलींचा समावेश आहे.
सीबीएसई दहावी, बारावी परीक्षा आजपासून सुरू
By admin | Published: March 09, 2017 1:47 AM