शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग राज्यात पहिला  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 5:54 PM

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे.

पनवेल  - सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला आहे. त्याला एकूण 98.8 टक्के गुण मिळाले. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत  हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी देशामधून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या आहेत.दरम्यान, महाराष्ट्रातून पहिला आलेला शशांक नाग हा नवीन पनवेल मधील  डीएव्ही शाळेतील विद्यार्थी आहे. त्याला इंग्रजी आणि गणित या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.  सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे सीबीएसईच्या बोर्डानं लवकर परीक्षा घेतल्या होत्या. यानंतर अवघ्या 28 दिवसांमध्ये परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवलं असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचं प्रमाण 79.5 टक्के इतकं आहे. यंदा 10 विभागात सीबीएसईची परीक्षा घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी ती 16 विभागांमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली. यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली. या विभागातले तब्बल 98.2 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या 92.3 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळालं. तर 91.78 टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले. 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रNavi Mumbaiनवी मुंबई