शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

दिव्यांगांच्या राखीव डब्यात सीसीटीव्ही

By admin | Published: December 28, 2016 2:12 AM

लोकलमधील दिव्यांगांच्या राखीव डब्यात बेकायदा प्रवेश करणाऱ्या अन्य प्रवाशांवर आता वचक ठेवणे रेल्वे प्रशासनाला सहज शक्य होईल. दिव्यांगांच्या डब्यातही सीसीटीव्ही

मुंबई : लोकलमधील दिव्यांगांच्या राखीव डब्यात बेकायदा प्रवेश करणाऱ्या अन्य प्रवाशांवर आता वचक ठेवणे रेल्वे प्रशासनाला सहज शक्य होईल. दिव्यांगांच्या डब्यातही सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असून, तसा प्रस्तावच तयार केला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रत्येक डब्यात दोन सीसीटीव्ही लागतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुरुवातीला दोन्ही मार्गांवरील प्रत्येकी ५0 महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. यानंतर आता मध्य रेल्वेने दिव्यांगांच्या डब्यातही सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकलच्या दोन डब्यांमधील एक-एक कक्ष दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असतो. परंतु गर्दीच्या वेळी या डब्यांत अन्य प्रवासी प्रवेश करतात. राखीव डब्यांतून अन्य प्रवाशांनी प्रवेश करणे हा गुन्हा असून, त्याविरोधात लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफकडून कारवाईही केली जाते. तरीही अनेकांकडून हा नियम पायदळी तुडवत अपंगांच्या डब्यात प्रवेश केला जातो. यात काही वेळा अन्य प्रवासी व दिव्यांग प्रवासी यात खटकेही उडतात. याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मध्य रेल्वेने दिव्यांगांच्या डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या ताफ्यातील १४५ लोकलमधील २९0 डब्यांत सीसीटीव्ही बसविले जातील. प्रत्येक डब्यात दोन याप्रमाणे ५८0 सीसीटीव्ही बसविणार असून, पाच कोटी रुपये खर्च येईल, अशी माहिती त्यांनी दिली. विभागीय कार्यालयाकडून प्रस्ताव तयार केला असून, तो मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. (प्रतिनिधी)- दिव्यांग प्रवासी सोडून अन्य कोणते प्रवासी प्रवास करतात यावर देखरेख ठेवली जाईल.- बेकायदेशीरपणे प्रवास करणारे प्रवासी कोणत्या स्थानकातून डब्यात चढतात आणि उतरतात याचा मागोवा घेऊन त्यांच्यावर कारवाई करणेही सोपे जाईल.