लोणार (जि. बुलडाणा) : अवैध वाळूउपशाला चाप लावण्यासाठी तालुक्याच्या भुमराळा येथील पूर्णा नदीच्या रेतीघाटावर सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच या रेतीघाटावर देखरेखीसाठी दोन तलाठय़ांची नियुक्तीही तहसीलदारांनी केली आहे. वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा उगारत महसूलच्या अधिकार्यांनी या वाहनांवर कारवाई केल्यास त्यांना शिवीगाळ तसेच मारहाण होण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी रेतीघाटावर सीसी टीव्ही कॅमेरे बसविले असून, यामुळे रेती घाटावर २४ तास तिसर्या डोळ्य़ाची नजर राहणार आहे. तसेच दोन तलाठय़ांची नियमित नियुक्ती करण्यात आली आहे.
वाळूमाफियांवर नजर ठेवणार सीसीटीव्ही!
By admin | Published: February 09, 2016 2:27 AM