नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवभोजन थाळीवाटपात केंद्रचालकांकडून खाेट्या नाेंदी दाखवून लाखो रुपये लाटले जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर असे गैरव्यवहार टाळण्यासाठी राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्राच्या संचालकांनी ३१ जानेवारी २०२२ अखेरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश अन्न व नागरीपुरवठा विभागाने काढले असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरून सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप फडणवीस यांच्यासह चित्रा वाघ यांनी मुंबईत नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात केला होता. शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठीच शिवभोजन योजना सुरू केली आहे. शिवाजी महाराजांच्या नावे योजनेत भ्रष्टाचार होत असून, हा महाराजांचा अपमान असल्याचे सांगून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचे विधिमंडळात वाभाडे काढले होते.
शिवभोजन केंद्रचालकांनी स्वखर्चाने हे कॅमेरे बसवायचे आहेत. याबाबत राज्य शासनाचे आदेश नुकतेच प्राप्त झाले असून, त्यानुसार ठाणे जिल्ह्यात त्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. -राजू थोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे जिल्हा.
अधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारीविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिवभोजन केंद्रावर ३१ जानेवारीपर्यंत सीसीटीव्ही कॅमरे बसविले आहेत किंवा नाही, याची तपासणी करून कार्यवाही करावी. शिवभोजन केंद्राचे देयक देताना तक्रार आल्यास सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी. तक्रारीवर अंतिम आदेश येईपर्यंत सीसीटीव्ही फुटेज गहाळ होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या निर्देशानुसार शिवभोजन थाळीत खाद्यपदार्थ मिळतात का, पिण्याचे पाणी स्वच्छ आहे का, हेही यानिमित्ताने तपासता येणार आहे.
हे आहेत आदेशnप्रत्येक शिवभोजन केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेतnकेंद्राच्या क्षमतेनुसार त्यांची संख्या असावीnप्रत्येक कॅमेऱ्यात शिवभोजन दिसायला हवे
nकेंद्रचालकाने कमीतकमी ३० दिवसांचे फुटेज तपासणीसाठी उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावीnआवश्यकता भासेल तेव्हा हा सर्व डाटा तपासणीसाठी पेन ड्राइव्हमधून अधिकाऱ्यांना द्यावाnवीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करून अखंड फुटेज मिळेल, याची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्रचालकाची राहील.