ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - सव्वा कोटी जनतेची तहान भागवत असल्याने संवेदनाशील ठरणा-या जलस्त्रोंना अतिरेकी कारवाईचा धोका असतो. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार धरणक्षेत्रात सुमारे साडेसातशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.मुंबईला तानसा, वैतरणा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुलसी व विहार या तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. या तलावांवर गस्त ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात असतात. मात्र तलाव परिसर मोठा असल्याने ही कुमूक अपुरी ठरते. त्यातच संभाव्य अतिरेकी हल्ल्यामुळे तलाव परिसर संवेदनशील ठरत आहेत. त्यामुळे अखेर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात वैतरणा तलावाच्या जंगल क्षेत्रात कॅमेरे लावले जाणार आहेत. येथे संगणकावर सुरक्षा नोंदणी प्रणाली कार्यान्वित केली जााणार आहे. यामुळे तलावांबरोबरच मुंबईत मोठ्या जलवा वाहिन्यांवर नजर ठेवता येणार आहे. यासाठी एक कोटी आठ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर झाला असून, लवकरच त्यावर अंमल होणार आहे.
तलावांवर सीसीटीव्हीची नजर
By admin | Published: January 02, 2017 9:39 PM