शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

By admin | Published: July 10, 2017 2:35 AM

रविवारी शहरात सर्वत्र गुरुपौर्णिमेचे वातावरण पाहण्यास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रविवारी शहरात सर्वत्र गुरुपौर्णिमेचे वातावरण पाहण्यास मिळाले. शहरातील अनेक मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भजन, कीर्तन आणि प्रवचनासह विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थांच्या मठांमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रामुख्याने दादर येथील स्वामींच्या मठामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत, त्यांच्या गुरूंची भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या, तर ज्यांना रविवारी गुरूंना भेटता आले नाही, अशा लोकांनी त्यांच्या गुरूंना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली.रविवारी श्री स्वामी समर्थांच्या मठांसह शहरातील श्रीदत्तगुरूंच्या मंदिरांमध्येही दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर, विलेपार्ले येथील श्रीदेवदत्त प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला. विक्रोळी येथील सद्गुरू दाभोळकर स्वामींनी त्यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. प्रत्येक जण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना एखादी भेट, पुष्पगुच्छ किंवा एक फूल तरी देत असतो. त्यामुळे शुक्रवारपासूनच दादरच्या फूल बाजारामध्ये फुलांची आवक वाढली होती. त्यामध्ये गुलाबाची मागणी सर्वात जास्त असल्याने, झेंडूच्या फुलांनी भरलेल्या दादरच्या फूल बाजारामध्ये सर्वत्र गुलाबाची फुले पाहण्यास मिळाली. सोशल मीडियावर गुरूप्रेमाचे भरतेरविवारी अनेकांनी त्यांच्या गुरूंना भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या, परंतु अनेकांना रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे किंवा कामामुळे त्यांच्या गुरूंना भेटता आले नाही. अशा लोकांनी सोशल मीडियाच्या मदतीने गुरूंना शुभेच्छा दिल्या व त्यांच्याकडून आशीर्वादही घेतले. फेसबुक टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर गुरुपौर्णिमेचे वातावरण पाहण्यास मिळत होते. सोशल मीडियावर गुरू देवदत्त, स्वामी समर्थ, गुरू द्रोणाचार्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई, शिवरायांचे गुरू समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज यांच्या कथा व फोटो फिरत होते.>गुरुपौर्णिमा नव्हे ‘गुगल पौर्णिमा’!>मुंबई : सध्याच्या तंत्रज्ञान युगात ‘गुगल’ला तरुणाई आपला गुरू मानत आहे. गुगलमुळे कोणत्याही प्रकारची माहिती एका क्लिकवर सगळ््यांना उपलब्ध होते, तर अशा ‘गुगल’ गुरूंना गुरुवंदनेसाठी अनोख्या गुगल पौर्णिमेचे आयोजन केले होते. एका क्लासच्या विद्यार्थ्यांनी कांदिवली येथील समता हॉलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी सॉफ्टवेअरतज्ज्ञ प्रसाद शिरगावकर म्हणाले, मिळालेल्या माहितीचा वापर करून त्याचे कौशल्यात रूपांतर होते. त्यातून प्राप्त होणाऱ्या अनुभवाचा विचार केला जातो, त्या अनुभवातून ज्ञान प्राप्ती होते. तर वेब पत्रकार प्रशांत जाधव म्हणाले की, मुली तंत्रज्ञानाला काही वेळा घाबरतात. मात्र, त्यांनी तंत्रज्ञानातील सर्व गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. तर सायबर गुन्हांचे तज्ज्ञ निखिल महाडेश्वर म्हणाले, गुगलवर मोफत अ‍ॅप्लिकेशन, गेम्स डाउनलोड करतो, पण हे मोफत नसते. डाउनलोड करताना आपण ‘आय एक्सेप्ट’ बटणावर क्लिक करतो. त्याद्वारे आपले कॉन्टॅक्ट्स, मेसेज, कॉल हिस्ट्री, लोकेशन, वाय-फाय, कॅमेरा या गोष्टी आपण खुल्या करत असतो. तंत्रज्ञानाचा आपण योग्यरीत्या वापर न केल्यास, त्यातून सायबर गुन्हे घडण्याचाही धोका असतो. कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर सोन्नर यांनी विद्यार्थ्यांना अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून गुगलचे फायदे, तोटे समजावून सांगितले. प्रशांत पेडणेकर यांनी ‘गुगल पौर्णिमे’ची संकल्पना मांडली, त्यास उत्तम प्रतिसाद मिळालामानवसेवा हीच गुरुसेवामुंबई : मानवसेवा हीच खरी परमेश्वराकडे रुजू होणारी गुरुसेवा आहे, असे प्रतिपादन आमदार सुनील प्रभू यांनी गोरेगाव (पूर्व) आरे रोडवरील दत्त मंदिर येथे केले. श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे पौर्णिमेनिमित्त गरजू, ज्येष्ठ नागरिक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना छत्रीवाटप, गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप आणि अपंगांना व्हीलचेअर वाटप आयोजित कार्यक्रमात सुनील प्रभू बोलत होते. या वेळी नगरसेविका साधना माने, मंडळाचे अध्यक्ष सुधाकर देसाई, विधानसभा संघटक स्नेहा गोलतकर उपस्थित होते.