शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

सेलिब्रिटींनो, नाट्यगृह दत्तक घ्या!

By admin | Published: February 08, 2015 11:35 PM

नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील कलावंत एकत्र येतात. संकल्पनांची आदान-प्रदान होते. सर्वच कल्पनांना नियामक मंडळाचे व्यासपीठ लाभत नाही

बेळगाव : नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील कलावंत एकत्र येतात. संकल्पनांची आदान-प्रदान होते. सर्वच कल्पनांना नियामक मंडळाचे व्यासपीठ लाभत नाही किंवा त्यावर ठरावाने शिक्कामोर्तबही होत नाही. परंतु काही कल्पना या साऱ्यांच्या पलीकडे जाणाऱ्या असतात आणि त्यावर संबंधितांनी गांभीर्याने विचारही करायचा असतो. यशस्वी कलावंतांनी नाट्यगृहे देखभालीसाठी दत्तक घ्यावीत, ही सांगलीचे शफी नायकवडी यांची संकल्पना अशीच...नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य असलेले नायकवडी मंडळाच्या निर्णयांवर मुंबईचा वरचष्मा असतो, असे सांगतात. नाट्य परिषदेचे राज्यभरात साडेएकोणीस हजार सदस्य आहेत. तथापि, नाटक ज्याप्रमाणे महानगरांपुरतेच सीमित राहिले, तसेच परिषदेचे निर्णयही बहुतांश मुंबई-पुण्यापुरतेच सीमित राहतात. वस्तुत: प्रत्येक शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेचे किंवा काही ठिकाणी खासगी नाट्यगृह असतेच. बहुतांश नाट्यगृहांची अवस्था देखभालीअभावी बिकट झालेली असते. सोयीसुविधांचा अभाव असतो. अनेक रंगकर्मी या नाट्यगृहांमध्ये प्रयोग करूनच मोठे झालेले असतात. अशा यशस्वी कलावंतांनी किमान मूळ शहरातले नाट्यगृह देखभालीसाठी दत्तक घ्यायला काय हरकत आहे, असा नायकवडींचा प्रश्न! खासगी नाट्यगृहे दत्तक मिळण्याची शक्यता कमी असली, तरी पालिका-महापालिका नाट्यगृहे दत्तक देऊ शकतील. तेथे कमी असलेल्या सोयीसुविधा पुरविणे, देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करणे, सुशोभीकरण यासाठी फारशी रक्कम खर्ची पडणार नाही. कलावंत तेवढा खर्च नक्की करू शकतील, अशी संकल्पना नायकवडी यांनी अनौपचारिक गप्पांत सांगितली. (खास प्रतिनिधी)