- नारायण जाधव , ठाणेसंपुआ सरकारने पालघर येथून सुरू केलेल्या देशपातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी २०१५-१६करिता केंद्र सरकारने आपल्या ७५ टक्क्यांच्या हिश्श्यातून ३९६ कोटी ४५ लाखांचा पहिला हप्ता महाराष्ट्र सरकारला दिला आहे. त्यातून राज्य आरोग्य सोसायटी विविध आरोग्यविषयक सुधारणा करून राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा बळकट करणार आहे. विविध लसीकरण मोहिमा, आयोडिन कार्यक्रम, पल्स पोलिओ मोहीम, ग्रामीण कुटीर रुग्णालयांत सुधारणा, नवीन आरोग्य केंद्रांची बांधणी, त्यात डॉक्टर्स, नर्ससह इतर रिक्त पदांची भरती करून अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यावर ही रक्कम खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.केंद्र सरकारने २०१४-१५मध्ये सर्व केंद्र पुरस्कृत आरोग्य योजना एकत्रित करून त्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान हे नाव दिले. त्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांचा समावेश केला. यातील ग्रामीण अभियानासाठी आपल्या हिश्श्याच्या ७५ टक्के अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ही रक्कम दिली आहे.राज्यात आजघडीला ग्रामीण आरोग्य सेवेत अनेक उणिवा आहेत. लोकसंख्येच्या मानाने अद्यापही राज्याची आरोग्य सेवा अनेक आघाड्यांवर तोकडी असल्याचे केंद्र शासनाची आकडेवारी सांगते. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यास भरपूर वाव असून, त्यासाठीच हे ३९६ कोटी ४५ लाख रुपये वापरले जाणार आहेत.केंद्राच्या आकडेवारीनुसार, राज्यात आजघडीला २८३० आरोग्य उपकेंद्रे, ३७८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १८४ कम्युनिटी हेल्थ सेंटर, ३९१५ पुरुष हेल्थ वर्कर, १८३ स्त्रीरोगतज्ज्ञ, १८३ बालरोगतज्ज्ञ, ९३८ विशेष तज्ज्ञ, २७८ क्ष-किरणतज्ज्ञ, ८९८ प्रयोगशाळातज्ज्ञांची कमतरता आहे. याशिवाय, अनेक कुटीर रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, अनेक प्रकारची यंत्रे उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी ती असली तरी चालविण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नाहीत. यामुळे ग्रामीण आरोग्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. तो सावरण्यासाठी या अनुदानाचा मोठा फायदा होणार आहे.खर्च करण्यात येणारी रक्कम 190.9 कोटी रु. कुटीर रुग्णालयांत सुधारणा10.27 कोटी रु. दैनंदिन लसीकरण कार्यक्रम16.94 कोटी रु. पल्स पोलिओ लसीकरण32 लाखराष्ट्रीय आयोडिन कार्यक्रम160.95 कोटी रु.आरोग्य केंद्रांत सोयीसुविधा17.88 कोटी रु. आरोग्य केंद्रांची बांधणी396.45 कोटी रुपये एकूण रक्कम
ग्रामीण आरोग्यासाठी केंद्राचा ३६६ कोटींचा डोस
By admin | Published: October 23, 2015 2:08 AM