ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 : राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने कायदा पारित करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ सुरेंद्र जैन यांनी केली. प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.जैन म्हणाले की, संबंधित जागेवर राम मंदिर असल्याचे पुरावे समोर आले आहे. इलाहाबाद उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने चर्चेचा मार्ग सुचविला होता. मात्र स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या काही मुस्लिम संघटनांनी चर्चेची दारे बंद ठेवली. त्यामुळे शेवटचा मार्ग म्हणून हिंदू समाजाने संकल्प करत देशात ५ हजार सभांद्वारे जनजागरण करणार आहे. सोबतच शोभायात्रा आणि ग्रामसभा घेतल्या जातील. त्यामधून निर्माण होणाऱ्या वातावरणाला कोणतीही संघटना किंवा व्यक्ती विरोध करू शकणार नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र शासनाने पुढाकार घेऊन कायदेशीररित्या हा प्रश्न मार्गी लावावा. यावर्षी भव्य राम मंदिर निर्मातीची गोड बातमी नक्कीच समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रामविरोधी म्हणजेच राष्ट्रविरोधीराम मंदिराला विरोध करणारे तथाकथित सेक्युलर मुस्लीम हे राष्ट्रविरोधी असल्याचा आरोपही जैन यांनी केला. जैन म्हणाले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्याप्रकारे सोमनाथ मंदिराची उभारणी केली होती, त्याप्रमाणेच राम मंदिर उभारावे. कारण याठिकाणी पूर्वी बाबराच्या विजयाचा स्तंभ होता. त्यामुळे बाबराचे समर्थन करणारे राष्ट्रविरोधी आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844uw4