नवी दिल्ली : कोकणासह राज्यातील रस्ते आणि नक्षलग्रस्त भागातील रोजगारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून मदतीचे आश्वासन मिळविले. इंदापूर-पनवेल द्रुतगती महामार्गाचे काम मार्च २०१६पर्यंत पूर्ण करा, अशी सूचना गडकरी यांनी अधिकाऱ्यांना केली, तर नक्षलग्रस्त भागाच्या औद्योगिक विकासासाठी केंद्र शासन पूर्ण सहकार्य व आवश्यक सुरक्षा पुरवेल, अशी ग्वाही राजनाथसिंह यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राजधानीत केंद्रीय मंत्री गडकरी व राजनाथसिंह यांची भेट घेतली. परिवहन भवन येथे गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोकणातून जाणाऱ्या इंदापूर-पनवेल द्रुतगती महामार्गाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.नक्षलग्रस्त भागातील विकास व सुरक्षाविषयक बैठकीत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी महाराष्ट्र राबवित असलेल्या कृती आराखड्याचे कौतुक केले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरिश आत्राम यांच्यासह गडचिरोली, भंडारा भागातील लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)इंदापूर-पनवेल, इंदापूर व झारप द्रुतगती महामार्गासाठी राज्य शासनाने भूसंपादन कार्यास गती द्यावी, मुंबई-गोवा महामार्गाची निविदा प्रक्रि या सुरू करावी. - नितीन गडकरी नक्षलग्रस्त भागात उद्योग व रोजगार निर्मितीसाठी राज्य शासन अधिक प्रयत्न करीत आहे. केवळ खनिज उत्पादन न करता त्यावर प्रक्रि या करणारे उद्योग या भागात यावेत यासाठी राज्य शासनाने कृती आराखडा तयार केला आहे. - देवेंद्र फडणवीस
रस्त्यांसाठी केंद्राचे सहकार्य
By admin | Published: August 28, 2015 2:11 AM