शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
4
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
6
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
7
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
8
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
9
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
10
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
11
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
12
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
13
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
14
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
15
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
16
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
17
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
18
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
19
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
20
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट

एसटीमध्ये केंद्राचे दिव्यांग ओळखपत्र चालणार अर्धे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 7:00 AM

दिव्यांगांना स्थानिक बससेवा, राज्य मार्ग परिवहन विभाग आणि रेल्वेच्या प्रवासात तिकिटाल सवलत दिली जाते....

ठळक मुद्देएसटीला स्वत:च्या निर्णयाचा विसर : अर्धवट निर्णयामुळे काही दिव्यांगांना एसटीचा दाखला आवश्यक केंद्र सरकारने देशातील दिव्यांगांसाठी विशेष युडीआयडी ओळखपत्र केले जाहीर

पुणे : दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्रांच्या जंजाळातून सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) तिकिटातील सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, ही सवलत देताना तीव्र अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींच्या सहायकाला सवलत मिळविण्यासाठी एसटीचा दाखला बंधनकारक केला आहे. त्यामुळे काही दिव्यांगांना गरज नसताना पुन्हा एसटीकडे दाखल्यासाठी खेटे मारावे लागतील. दिव्यांगांना स्थानिक बससेवा, राज्य मार्ग परिवहन विभाग आणि रेल्वेच्या प्रवासात तिकिटाल सवलत दिली जाते. मात्र, प्रत्येक सवलत मिळविण्यासाठी दिव्यांगांना वेगवेगळी ओळखपत्रे मिळवावी लागतात. रेल्वे, स्थानिक बससेवा आणि एसटी अशी तीन ओळखपत्रे बाळगावी लागतात. केंद्र सरकारने देशातील दिव्यांगांसाठी विशेष युडीआयडी ओळखपत्र जाहीर केले आहे. त्यासाठी सर्व कागदपत्रांची तपासणी, दिव्यंगत्वाचे प्रमाण याची खात्री केली जाते. मग, एकच ओळखपत्र राज्य आणि देशातील सेवांसाठी लागू करण्याची मागणी दिव्यांगांकडून करण्यात आली होती. एसटीच्या निम आरामसह इतर बससेवेमधे दिव्यांगांना प्रवास शुल्कामधे ७५ टक्के आणि त्याच्या मदतनीसास ५० टक्के सवलत देण्यात येते.

दिव्यांगांना एसटीसाठी वेगळे ओळखपत्र काढावे लागू नये यासाठी एसटीने अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार केंद्र सरकारने लागू केलेले युनिक आयडी ग्राह्य धरण्याचा स्तुत्य निर्णय बुधवारी (दि. १८) घेतला. मात्र, सहायकाला प्रवासात सवलत हवी असल्यास आगार व्यवस्थापकांच्या सही-शिक्क्याचा दाखला बंधनकारक असल्याचे आदेशात नमुद केले आहे. या पुर्वी १०० टक्के परावलंबी असलेल्या अंध-अपंग व्यक्तींना त्यांच्या मदतनीसास प्रवास शुल्कात ५० टक्के सूट मिळत होती. त्यात १२ ऑक्टोबर २०१८ रोजी सुधारणा करण्यात आली. आता ६५ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीस प्रवास शुल्कात सवलत मिळते. केंद्र सरकारने दिलेल्या युनिक कार्डमधे अपंगत्व टक्केवारीचा देखील उल्लेख असतो. त्यावरुन संबंधित व्यक्तीला ६५ टक्के अपंगत्व आहे, की त्या पेक्षा कमी हे समजू शकते. मग, त्यासाठी पुन्हा एसटीचे ओळखपत्र घेण्याची आवश्यकताच उरत नाही. असे, असताना एसटीने सहायकाला सवलत देण्यासाठी दाखल्याचे बंधन घातले आहे. ----------------

दिव्यांग व्यक्तींना प्रवासात युडीआयडी कार्डवर देखील सवलत देण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. मात्र, यापुर्वी दिलेले पास देखील सुरुच आहेत. एसटीच्या वाहतूक व्यवस्थापकांनी देखील तसाच निर्णय घेतला आहे. मात्र, नव्या आदेशाचा स्थानिक पातळीवर चुकीचा अर्थ काढून दिव्यांगांना सवलत नाकारली जाऊ नये. हरिदास शिंदे, दिव्यांग चळवळीतील कार्यकर्ते--------------------

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावतेGovernmentसरकार