शहरं
Join us  
Trending Stories
1
"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
2
'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
3
"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी
4
धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार
5
RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न
6
"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?
7
₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
8
“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
9
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार! त्यांच्यासह बहिणीवर कारवाई होणार, अटक वॉरंट जारी
10
Akash Anand : “मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या...“; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी
11
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या हरिदास टेंभूर्णे यांचे निधन
12
Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम
13
टोलमध्ये सर्वसामान्यांना दिलासा! ३ हजार रुपयांचा पास मिळणार; FASTag बाबतही अटी असणार
14
“काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं” शरद पवारांसोबत भेटीनंतर आज बारामतीत अजित पवार म्हणाले…
15
कधी काळी अफगाणिस्तानात लाखोंच्या संख्येने हिंदू राहत होते, तालिबानी सरकार आल्यानंतर किती उरले? जाणून धक्का बसेल
16
"देशातून चालते व्हा, नाहीतर..."; अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी नवीन नियम लागू
17
RR vs RCB : विराटकडून ही अपेक्षा नव्हती! पण त्याला कोण काय बोलणार? बॉलरची रिअ‍ॅक्शन बघाच (VIDEO)
18
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणात भाजपचा मोठा दावा; हिंदू घरे सोडून पळून गेले; आतापर्यंत १५० जणांना अटक
19
सनस्क्रीन नसेल तरी नो टेन्शन! उन्हापासून बचावासाठी देशी जुगाड; ‘हा’ आहे जबरदस्त सोपा उपाय
20
आमदाराच्या मुलाची दादागिरी; मंदिराचे दरवाजे उघडायला विरोध केल्याने पुजाऱ्याच्या मुलाला मारहाण

‘नीट’साठी आता जातीच्या दाखल्यांचा गोंधळ; विद्यार्थी-पालक संभ्रमात 

By अविनाश कोळी | Updated: February 11, 2025 16:46 IST

अर्ज करतानाच केंद्राचा दाखला देण्याची अट

अविनाश कोळीसांगली : यंदाच्या नीट परीक्षेसाठी अर्ज करताना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना केंद्रीय जातीचा दाखला आवश्यक केला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे हा दाखला नसेल त्यांना संबंधित विभागाकडे अर्ज करून त्या अर्जाची पोचपावती अर्जासोबत सादर करायची आहे. मात्र, केंद्रीय दाखल्याची मुदत एक वर्षाची असल्याने सर्व विद्यार्थ्यांना केंद्रीय कोट्यातून प्रवेशावेळी पुन्हा केंद्रीय दाखला काढावा लागणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी गोंधळले आहेत.नीटसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ मार्चपर्यंत अर्जाची मुदत आहे. या काळात काढलेल्या केंद्रीय जातीच्या दाखल्याची मुदत ३१ मार्च २०२५पर्यंतच असेल. मात्र, केंद्रीय कोट्यातून वैद्यकीय प्रवेश घेताना १ एप्रिल २०२५ नंतरचाच दाखला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे नीटच्या अर्जासाठी यावर्षी काढलेल्या केंद्रीय दाखल्याचा उपयोग ऑल इंडिया कोटासाठीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी होणार नाही. प्रवेश अर्जासोबत केंद्रीय दाखला आवश्यक करण्याचे एनटीएचे प्रयोजन काय? असा सवाल विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित होत आहे.

यापूर्वीची पद्धत काय होती?अर्ज करताना दाखला नसेल तर वैद्यकीय प्रवेश घेताना सदर दाखला हजर करू, असे प्रतिज्ञापत्र अपलोड करण्याची संधी गतवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली होती. यंदाही तशी संधी देण्याची आवश्यकता होती.

एजन्सीकडून पूर्वसूचना नाहीआधारकार्ड अपडेट करण्याविषयी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पूर्व नोटीस काढली होती. मात्र, केंद्रीय दाखल्यासंबंधी कोणतीही पूर्वसूचना एजन्सीने दिलेली नाही. असे असताना ऐनवेळेस हा दाखला आवश्यक केल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

सध्या देशभरात बारावीची परीक्षा सुरू असल्याने केंद्रीय जातीचा दाखला मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाया जाणार आहे. या दाखल्याचा उपयोग परीक्षेपुरता अर्ज करण्यासाठी होणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी नव्याने पुन्हा दाखला काढावा लागेल. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केंद्रीय जातीच्या दाखल्याऐवजी सेल्फ डिक्लरेशन फॉर्म अपलोड करण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सल्लागार, सांगली

टॅग्स :SangliसांगलीMedicalवैद्यकीयexamपरीक्षाStudentविद्यार्थीCaste certificateजात प्रमाणपत्र