पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी व्यक्त केले. ‘अ-जून तेंडुलकर’ पुस्तकाच्या प्रकाशन व चित्रपट महोत्सवानिमित्त निहलानी शुक्रवारी पुण्यात आले असता त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात पत्रकारांशी संवाद साधला. एफटीआयमधील विद्यार्थ्यांनी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात सुरू केलेल्या आंदोलनासंदर्भात तसेच काही विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या उपोषणासंदर्भात त्यांना प्रतिक्रिया विचारली. त्या वेळी ते म्हणाले, गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीसंदर्भात विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे केंद्र सरकारने गांभीर्याने ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. ही मुले काही शाळकरी नाहीत. हा प्रश्न प्रतिष्ठेचा करणे योग्य नाही.
केंद्र सरकारने प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये
By admin | Published: September 12, 2015 2:08 AM