कोल्हापूर : केंद्र सरकारने आणलेली कृषी विधेयके ही शेतकऱ्यांच्या फायद्याचीच आहेत. व्यापाºयांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन ‘एका बाजूला काटा, दुसºया बाजूला नोटा’ अशी परिस्थिती येणार असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे केला. बाजार समित्या बंद होणार नाहीत, तेथील हमीभावाची खरेदी बंद होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेत दानवे म्हणाले, बाजार समित्यांमधील हमीभावाची खरेदी बंद होणार नाही. व्यापाºयांच्या स्पर्धेचा फायदा शेतकºयाला होईल. आता पॅन कार्ड असणारा कोणताही व्यापारी बाजार समितीच्या लिलावात भाग घेऊ शकेल. व्यापारी शेतकºयांच्या घराकडे जातील. तेव्हा माल किती रुपयांना द्यायचा हे शेतकºयांच्या हातात असेल. जे स्वामीनाथन आयोगाने सांगितले, जे काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात मांडले, त्यापेक्षा आम्ही वेगळे काही केले नाही. पंजाबमध्ये राजकीय अडचणपंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने सत्तेवर आल्यास बाजार समिती कायद्यात बदल करण्याचे जाहीर केले आहे. त्याविरोधात तेथे अकाली दलाने भूमिका घेतली आहे. मग ते केंद्रात आमच्यासोबत राहतील का? स्थानिक राजकीय अडचण असल्याने ते बाहेर पडले असल्याचे दानवे म्हणाले.
एका बाजूला काटा, दुसऱ्या बाजूला नोटा; दानवे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 2:43 AM