पुणे : संपूर्ण देशभरात गाजलेल्या व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तपास करण्यावरुन केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात वादाची ठिणगी पडलेल्या एल्गार परिषदेच्या तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना केंद्र सरकारचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरात १२१ पोलीस अधिकाना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट तपास पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुण्यातील गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ़ शिवाजी पवार यांच्याकडे एल्गार परिषदेचा तपास होता़ नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरुन देशभरात विविध शहरात छापे घालण्यात आले होते. डॉ. शिवाजी पवार यांच्याकडे जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२० असा २ वर्षे या गुन्ह्याचा तपास होता. या तपासासाठी मोठे पथक कार्यरत होते.या तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसे पत्र राज्य शासनाला लिहिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने अचानक पुढाकार घेऊन हा तपास एनआयएकडे वर्ग केला. त्यावरुन केंद्र व राज्य शासनाबरोबरच महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते त्यांच्यातील वाद रंगला होता. केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे देण्याचे जाहीर करताच दुसºया दिवशी एनआयएचे अधिकारी मुंबईहून पुण्यात दाखल झाले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर टिका केली होती. मात्र, केंद्र सरकारच्या कायद्यामुळे राज्य सरकारला या गुन्ह्याचा तपास एनआयए कडे द्यावा लागला होता. त्यानंतर आता तब्बल ६ महिन्यांनंतर केंद्र सरकारने एल्गार परिषदेच्या तपासाचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल डॉ. शिवाजी पवार यांचा केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट तपास पदक देऊन गौरव केला जाणार आहे. राज्यातील पुरस्कार प्राप्त अधिकारी : डॉ. शिवाजी पवार (सहायक पोलिस आयुक्त), राजेंद्र बोकडे (पोलिस निरीक्षक), उत्तम सोनवणे (पोलिस निरीक्षक), नरेंद्र हिवरे ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक), ज्योती क्षीरसागर (पोलिस अधीक्षक), अनिल घेरडीकर (पोलिस उपअधीक्षक), नारायण शीरगावकर (पोलिस उपअधीक्षक), समीर शेख (सहायक पोलिस आयुक्त), किसन गवळी (सहायक पोलिस आयुक्त), कोंडीराम पोपेरे (पोलिस निरीक्षक)़़़़़़़़़़़़एकाच पदावर काम करणाऱ्या दोनअधिकाऱ्यांचा गौरवडॉ. शिवाजी पवार हे सध्या गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याअगोदर या ठिकाणी समीर शेख कार्यरत होते. त्यांची नाशिक येथे बदली झाली. तेथील मुथुट फायनान्सच्या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल त्यांना केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे़ पुण्यातील एकाच पदावर काम केलेल्या दोन अधिकाऱ्यांचा एकाचवेळी गौरव होण्याचा दुर्मिळ योगायोग आहे.
एल्गार परिषदेच्या तपासाला केंद्र सरकारचा 'उत्कृष्ट तपास' पुरस्कार;राज्यातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 9:59 PM
एल्गार परिषदेच्या तपासावरून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात पडली होती वादाची ठिणगी
ठळक मुद्देदेशभरात १२१ पोलीस अधिकाना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट तपास पदक देऊन गौरव करण्यात येणार