ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंबिवली - शहाडदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईकडे येणा-या वाहतुकीवर परिणाम झाला असून कामावर पोहोचण्यासाठी घरातून निघालेल्यांना सकाळीच त्रासाला सामोरे जाव लागत आहे. रुळ दुरुस्त करण्याचं काम सुरु असून किती वेळ लागेल याबाबत काही माहिती मिळालेली नाही.