ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 - मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला असताना त्यातच पारसिक बोगदा आणि कळवा येथे सिग्नल यंत्रणेच बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ठाणे आणि दिव्यादरम्यान अप मार्गावरील लोकल सेवा काही वेळेसाठी ठप्प होती. ब-याशचा लोकल जागेवरच उभ्या होत्या. लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं कल्याण, डोंबिवली, दिवा आणि कळवा स्थानकांत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आधीच मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे होत असताना त्यांच्या त्रासाला पारावार उरला नाही. 12.25ची लोकल जवळपास एक तास कल्याण स्थानकातच थांबून होती. स्टेशनवर लोकल सेवा विस्कळीत असल्याची उद्घोषणाही दिली जात आहे. तत्पूर्वी मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गांवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील हार्बर लाईन्सच्या विस्तारीकरणासाठी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विशेष मेगाब्लॉक घेतला आहे. मेन लाइनवरील कल्याण ते ठाणे दरम्यान अप स्लो मार्गावर स. 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे चालणार आहेत. तसेच ब्लॉकदरम्यान कल्याणवरून स. 10.47 ते दुपारी 4.15 पर्यंत स्लो आणि फास्ट लोकल अप फास्ट मार्गावरून चालविल्या जाणार आहेत. तसेच मेगाब्लॉगच्या दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा या स्थानकांवर अप स्लो लोकल थांबणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण मार्गे प्रवास करावा लागतोय. मेगाब्लॉकच्या काळात स. 10.08 ते दुपारी 2.42 वाजेपर्यंत सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व डाऊन मार्गावरील लोकलना दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबे दिलेत. तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमध्ये सीएसटीहून पनवेल/ बेलापूर/ वाशीसाठी सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकल सकाळी 10.35 ते दुपारी 3.48 वेळेत बंद राहतील. हार्बरच्या प्रवाशांना सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलमध्ये जादा फेऱ्या चालवल्या जात आहेत.
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत
By admin | Published: April 30, 2017 1:25 PM