मुंबई : ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मंगळवारी संध्याकाळी सीएसटी ते कांजूरमार्ग दरम्यानची लोकल सेवा कोलमडली. प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला.सीएसटी ते कांजूरमार्गदरम्यान संध्याकाळी ५.२०च्या सुमारास ओव्हरहेड वायरचा विद्युतप्रवाह कमी-जास्त होत होता. चारही मार्गांवर ही समस्या उद्भवल्याने अप आणि डाऊन मार्गांवरून धावणाऱ्या लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे लोकलचा वेग मंदावला. विद्युतप्रवाह पूर्ववत करण्याचा प्रयत्न रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडून केला जात होता. अखेर संध्याकाळी ६.२०ला विद्युतप्रवाह पूर्ववत करण्यात आला आणि लोकल सुरळीत धावू लागल्या. परंतु या घटनेमुळे लोकल १५-२० मिनिटे उशिराने धावू लागल्या. रात्री ९पर्यंत लोकलचा गोंधळ सुरू होता.
‘ओव्हरहेड’ बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2016 3:47 AM