मुंबई : कोरोनाच्या धास्तीने उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मजुरांनी गावची वाट धरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ केली आहे.त्यानुसार मुंबई-गोरखपूर स्पेशल विशेष गाडी १३ आणि २० एप्रिल रोजी एलटीटी येथून १६.४० वाजता सुटेल, तर पुणे-दानापूर विशेष अतिजलद विशेष गाडी ९, ११, १६ आणि १८ एप्रिल रोजी पुणे येथून १६.१५ वाजता सुटेल. मुंबई-पाटणा अतिजलद विशेष गाडी १२, १५ व १९ एप्रिल रोजी सीएसएमटी येथून ११.०५ वाजता सुटेल. मुंबई-गोरखपूर विशेष गाडी ७, १२, १४ व १९ रोजी सीएसएमटी येथून २३.३० वाजता सुटेल. मुंबई- दरभंगा अतिजलद विशेष गाडी १२ आणि १९ एप्रिल रोजी एलटीटी येथून ८.०५ वाजता सुटेल.आरक्षित तिकीट असेल तरच प्रवासविशेष गाड्यांसाठी ७ एप्रिलपासून आरक्षण करता येणार आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
मध्य रेल्वेने उत्तर प्रदेश, बिहारसाठी गाड्या वाढवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 3:04 AM