शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

मध्य रेल्वेचा बोजवारा : विक्रोळीजवळ सहाही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बंद

By admin | Published: May 25, 2016 10:21 PM

मध्य रेल्वे विस्कळीत होण्याच्या घटना सातत्याने घडत असून त्याचा प्रत्यय बुधवारीही दिसून आला.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - मध्य रेल्वे विस्कळीत होण्याच्या घटना सातत्याने घडत असून त्याचा प्रत्यय बुधवारीही दिसून आला. बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर सलग दोन तांत्रिक बिघाडांनी लोकल सेवेचा चांगलाच बोजवारा उडाला आणि रात्री घरी परतणाºया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विक्रोळी स्थानकाजवळ सहाही मार्गांवर सिग्नल यंत्रणेत आणि तत्पूर्वी सायन स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तसेच लोकलच्या पेन्टाग्राफमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे लोकलचा वेग अक्षरश: मंदावला आणि प्रवाशांना ऐन रात्रीच्या वेळी रुळावरुन प्रवास करणे पर्याय उरला नव्हता. बुधवारी रात्री मुंबईत पावसाच्या तुरळक सरी पडल्याने त्याचाच फटका बसल्याचे सांगितले जाते. रात्री ८.0६ च्या सुमारास सायन स्थानकाजवळील चारही मार्गांवरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला आणि एकच खोळंबा उडाला. त्यामुळे सीएसटीकडे जाणाºया आणि सीएसटीहून सुटणाºया लोकल जागीच थांबल्या. याचबरोबरच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या एका लोकलच्या पेन्टाग्राफमध्येही तांत्रिक समस्या उद्भवली आणि त्यात आणखी भर पडली. हे दोन्ही बिघाड दुरुस्त होण्यास रात्रीचे ८.४0 वाजले. सायन स्थानकाजवळ झालेल्या बिघाडापाठोपाठ विक्रोळी स्थानकाजवळ रात्री सव्वा आठच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. हा बिघाड सहा मार्गांवर झाल्याने मध्य रेल्वेचा आणखी बोºयाच वाजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लोकल एकामागोमाग जागीच थांबल्या. मेल-एक्सप्रेस गाड्या हळूहळू सुरु करण्यात आल्यानंतर लोकलच्या अन्य चारही मार्गांवरील लोकल सेवा ठप्पच झाली होती. जवळपास एक तासांपेक्षा जास्त वेळ होऊनही लोकल पुढे सरकत नसल्याने प्रवाशांनी रुळावरुन पायपीट करणेच पसंत केले. काही स्थानकांवर तांत्रिक बिघाडाची माहीती देत असल्याने आणि लोकल तासनतास पुढे सरकत नसल्याचे पाहताच स्थानकाबाहेरील टॅक्सी, रिक्षांचा पर्याय अनेक प्रवाशांकडून निवडण्यात येत होता. मस्जिद ते दादर स्थानकापर्यंत एकही लोकल येत नसल्याने या स्थानकांवर तर प्रचंड गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत हीच परिस्थीती सर्व स्थानकांवर होती. विक्रोळी येथील सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होता. या घटनेमुळे मात्र कामावरुन घरी परतणाºयांचे मात्र हाल झाले.

.....................................

ऐरोली स्थानकाजवळ रात्री ८.४0 च्या सुमारास एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड काही वेळातच दुरुस्त करण्यात आला. मात्र या घटनेमुळे हार्बरचा चांगलाच बोºया वाजला होता.