Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये जवळपास 2500 जागांवर भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजपासून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, शिक्षणाची अट, लिंक आदी माहिती पुढे देण्यात आली आहे. (Central Railway Recruitment 2021 for 2500+ Apprentice Posts: Apply Online @rrccr.com, Download RRC Railway Notification Here)
मध्ये रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 5 मार्च 2021 असणार आहे. मध्ये रेल्वेच्य़ा या पाच ठिकाणी एकूण 2532 जागा भरण्यात येणार आहेत. याशिवाय परळच्या वर्कशॉपमध्ये, कल्याण डिझेल शेड आणि मनमाडच्या वर्कशॉपमध्येही विविध जागांवर भरती करण्यात येत आहे.
कुठे किती जागा....मुंबईकॅरेज अँड वॅगन (कोचिंग) वाडी बंदर - 288 पोस्टमुंबई कल्याण डिझेल शेड - 53 पोस्टकुर्ला डिझेल शेड - 60 पोस्टएसआर. डीईई (टीआरएस) कल्याण - 179 पोस्टएसआर. डीईई (टीआरएस) कुर्ला - 192 पोस्टपरळ वर्कशॉप - 418 पोस्टमाटुंगा वर्कशॉप - 547 पोस्टएस अँन्ड टी वर्कशॉप, भायखळा - 60 पोस्टभुसावळ
कॅरेज व वॅगन डेपो - 122 पोस्टइलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ - 80 पोस्टइलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कार्यशाळा - 118 पोस्टमनमाड कार्यशाळा - 51 पोस्टटीएमडब्ल्यू नाशिक रोड - 49 पोस्टपुणेकॅरेज व वॅगन डेपो - 31 पोस्ट्सडिझेल लोको शेड - 121 पोस्ट
नागपूरइलेक्ट्रिक लोको शेड - 48 पोस्टअजनी कॅरेज व वॅगन डेपो - 66 पोस्टसोलापूरकॅरेज व वॅगन डेपो - 58 पोस्टकुर्डुवाडी कार्यशाळा - 21 पदे
शिक्षणाची अट...या पदांसाठी शिक्षणाची अट ही 10 वी पास किंवा 12 वी पास अशी ठेवण्यात आली आहे. यासाठी 50 टक्के कमीतकमी गुण लागणार आहेत. व्होकेशनल, आयटीआय किंवा समकक्ष कोर्स केल्याचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे.
वयाची अट...वय 15 ते 24 वर्षे.
फी..उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे.
निवड कशी केली जाईल...10 वी किंवा १२ वीचे मार्क आणि आयटीआयमधील मार्क पकडून मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
रेल्वे भरतीच्या अधिकृत नोटिससाठी इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी, कसा करावा हे पाहण्यासाठीइथे क्लिक करा...नोकरी विषयक अन्य बातम्या पाहण्यासाठीइथे क्लिक करा...
Bhabha Atomic Research Centre (BARC) Recruitment 2021: भाभा अणुशक्ती संशोधन केंदामध्ये (BARC) नर्स, चालक आणि ट्रेनी व इतर जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज ही मागविण्यात आले आहेत.
भाभा अणुशक्ती केंद्राने नुकतेच पात्र उमेदवारांकडून विविध जागांसाठी अर्ज मागविले आहेत. एकूण 63 जागा आहेत. या पदांसाठी अनेकजण इच्छुक असून त्यांनी अर्ज भरण्यासही सुरुवात केली आहे. २१ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये ही भरती केली जाणार असून यासाठी 12 वी, पदवीधारक अर्ज करू शकणार आहेत.