मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्यस्थितीत केवळ अत्यावश्क सेवेतील कर्मचाºयांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावरून रोज ४२३ फेºया होता. प्रवाशांची सुरक्षा आणि सोयीसाठी १ आॅक्टोबरपासून अतिरिक्त आठ फेºया वाढविण्यात आल्या आहेत.या अतिरिक्त ८ फेºयांमध्ये २ महिला स्पेशल गाड्यांसह मुख्य मार्गावर ४ विशेष आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ४ विशेष गाड्या चालविण्यात येतील.मध्य रेल्वे मार्गावर कल्याण येथून ४ गाड्या (२ डाऊन व २ अप) धावतील. यामध्ये १ अप महिला विशेष कल्याण येथून सकाळी ०८.२५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०९.३४ वाजता पोहोचेल. तर १ डाऊन महिला विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १८.३५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे १९.४४ वाजता पोहोचेल.
डाऊन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.४५ वाजता सुटेल व कल्याणला १०.५० वाजता पोहोचेल. अप विशेष १६.१० वाजता कल्याण येथून सुटेल आणि १७.१६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष लोकल फक्त भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा आणि डोंबिवली येथे थांबतील. तर ट्रान्स हार्बर मार्गावरून ४ गाड्या धावतील. (२ डाऊन व २ अप) ठाण्याहून पनवेलला जाण्यासाठी तसेच येण्यासाठी असतील. पनवेल विशेष ठाणे येथून ०९.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०९.५२ वाजता पोहोचेल. पनवेल विशेष ठाणे येथून १८.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे १९.२४ वाजता पोहोचेल. ठाणे विशेष पनवेल येथून ०७.५५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०८.५० वाजता पोहोचेल. ठाणे विशेष पनवेल येथून १७.२० वाजता सुटेल आणि ठाणे येथे १८.१५ वाजता पोहोचेल. ही विशेष जलद असेल आणि फक्त रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर येथे थांबेल.