शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या १०० विशेष गाड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 12:01 PM

मध्य रेल्वेने मंबुई, पुण्याहून गोरखपुर व मंडुआडीहपर्यंत १०० साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना विशेष शुल्क आकारले जाणार आहे. ..

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मंबुई, पुण्याहून गोरखपुर व मंडुआडीहपर्यंत १०० साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना विशेष शुल्क आकारले जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या गाड्या सोडण्यात येतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. पुणे ते गोरखपुर दरम्यान ७ एप्रिल ते ३० जून या कालावधीत दर रविवारी विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी सायंकाळी ७.५५ वाजता पुणे स्थानकातून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता गोरखपुरमध्ये पोहचेल. तर प्रत्येक मंगळवारी सकाळी. ७.२५ वाजता गोरखपुर येथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पुण्यात दाखल होईल. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकुण २६ फेऱ्या होतील. पुणे ते मंडुआडीह ही विशेष गाडी ११ एप्रिल ते २७ जूनदरम्यान प्रत्येक गुरूवारी पुण्यातून ९.३० वाजता सुटेल. तर तिसऱ्या दिवशी पहाटे ३.२५ वाजता मंडुआडीह येथे पोहचेल. तिथून प्रत्येक शनिवारी पहाटे ४.४५ वाजता सुटून दुसऱ्या  दिवशी दुपारी १२ वाजता पुणे स्थानकात येईल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२ एप्रिल ते ५ जूलैदरम्यान प्रत्येक सोमवारी पहाटे ५.१० वाजता गोरखपुरसाठी विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी दुसऱ्या  दिवशी दुपारी १२.१० वाजता गोरखपुर स्थानकात पोहचेल. तर प्रत्येक शनिवारी गोरखपुर येथून दुपारी २.४० निघून दुसऱ्या दिवशी ८.२५ वाजता पुण्यात पोहचेल. मुंबई-मंडुआडीह गाडी १७ एप्रिल ते ३ जुलै दरम्यान धावेल. ही गाडी दुपारी १२.४५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वाजता मंडुआडीह स्थानकात दाखल होईल. तिथून सकाळी ६.३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी ७.३० वाजता मुंबईत पोहचेल.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलIndian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स