मुंबई /पुणे : मध्य रेल्वेने ९ ऑक्टोबरपासून मुंबई, पुणे, नागपूर, गोंदिया व सोलापूर या ठिकाणी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण क्षमतेने पण फक्त आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच यातून प्रवास करता येईल.मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई, मुंबई-पुणे) सिद्धेश्वर एक्स्प्रेस (मुंबई-सोलापूर), मुंबई-गोंदिया अशा गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. या सर्व गाड्यांच्या वेळा व क्रमांक पूर्वीप्रमाणेच आहेत. फक्त लक्षात येण्यासाठी म्हणून प्रत्येक क्रमाकांच्या आधी शून्य लिहिला आहे, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. ‘मुंबई-नागपूर दुरांतो विशेष’ १० आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. तर दुरांतो विशेष ट्रेन ९ आॅक्टोबरपासून नागपूर येथून सुटणार आहे. दोन्ही गाड्या इगतपुरी वगळता
नियमित थांब्यावर थांबतील. मुंबई-पुणे सुपरफास्ट विशेष ९ आॅक्टोबरपासून तर पुण्यावरून सुपरफास्ट विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज सुटेल मुंबई-गोंदिया सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. गोंदियावरून सुपरफास्ट विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. इगतपुरी वगळता नियमित गाडीच्या थांब्यात आणि वेळेत बदल नसेल.मुंबई-सोलापूर सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि दुसºया दिवशी सोलापूरला पोहोचेल. सोलापूरवरून सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसºया दिवशी पोहोचेल. तर, कर्जत, खंडाळा, लोणावळा, माढा, मोहोळ आणि भिगवन हे थांबा वगळता इतर थांब्यांवर थांबले.
थर्मल तपासणी करणारगाड्यांमध्ये प्रवासी बसण्याआधी त्याची थर्मल तपासणी केली जाईल. आॅक्सिजन लेवलही पाहिली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक आहे. दरम्यान, सरकार पुणे लोणावळा ही लोकल सेवाही १२ आॅक्टोबरपासून सुरू करत आहे. मात्र, यातून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येईल. यासाठी क्यूआर कोडचा वापर करणार आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे
रेस्टॉरंट, बार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरूमुंबई : राज्यातील रेस्टॉरंट, बार रोज सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत उघडे ठेवण्याची मुभा असेल, असे परिपत्रक राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाने काढले आहे. हा नियम कॅफे, कॅन्टिन, डायनिंग हॉल, हॉटेल, रिसॉर्ट, क्लबनाही लागू राहील. राज्यातील रेस्टॉरंट, बार५ आॅक्टोबरपासून उपस्थितीचे बंधन घालून सुरू करण्यात आले होते.