शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

कारण न देता नाकारले अपंगत्वाचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 2:36 AM

मुलाला कोणतेही कारण न देता अपंगत्वाचे प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याने त्याच्या आईने न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले

मुंबई : दहिसर येथे तीन वर्षांपूर्वी शाळेत सहविद्यार्थ्याने डोळ्यात पेन खुपसल्याने एक डोळा निकामी झालेल्या सात वर्षीय मुलाला कोणतेही कारण न देता अपंगत्वाचे प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याने त्याच्या आईने न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. दहिसर चेकनाका येथे राहणाऱ्या मनीषा कांबळे यांचा मुलगा प्रणव हा सुभेदार रामजी आंबेडकर शाळेत २0१४ साली तिसऱ्या इयत्तेत शिकत होता. ८ डिसेंबर २0१४ रोजी शाळेत गणिताचा तास सुरू असताना प्रवणच्या पेनाची शाई चुकून त्याच्या पुढील बाकावरील एका विद्यार्थ्याच्या शर्टला लागली. त्या रागाने त्या मुलाने आपल्या हातातील पेन प्रणवच्या डोळ्यात खुपसला. त्यामुळे जोरात रक्तस्राव होऊ लागला. या घटनेनंतर शाळेतील शिक्षकांनी प्रणवला शाळेत बसवून ठेवले आणि त्याच्या पालकांना बोलावण्यास शिपायाला पाठवले. पालक दीड तासाने शाळेत येईपर्यंत शाळेने कोणत्याही प्रकारचे प्राथमिक उपचार केले नाहीत अथवा डॉक्टरांशी संपर्क साधला नाही.प्रणवचे पालक शाळेत आल्यानंतर त्यांनी प्रणवला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तो डोळा निकामी झाला. उपचारादरम्यान संसर्ग होऊन एका कानाने ऐकू येईनासे झाले. दहिसर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. पालकांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतल्यांनतर त्यांनी आदेश दिले आणि त्यानंतरच तब्बल दीड महिन्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप या प्रकरणी दहिसर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले नसल्याची त्याच्या पालकांची तक्रार आहे. दरम्यान, प्रणव अंशत: अपंग असल्याने त्याला अपंगत्वाचा दाखला मिळावा यासाठी अर्ज केला असता वैद्यकीय बोर्डाने कोणतेही कारण न देता त्याला दाखला नाकारला असल्याचे कळवले. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य संबंधितांना निवेदने सादर केली आहेत. खासदार गजानन कीर्तिकर आणि हुसेन दलवाई यांनीही या प्रकरणाची दखल घेत प्रणवला नाकारलेला अंपगत्वाचा दाखला अनुज्ञेय नसल्याने याबाबत पडताळणी करून दाखला तसेच आर्थिक मोबदला देण्यात यावा, अशी पत्रे मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांना दिली आहेत. (प्रतिनिधी)