शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

सीईटी सोपी, कट आॅफ वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 4:34 AM

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा झाली. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयांची परीक्षा अत्यंत सोपी असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

पुणे  - राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा झाली. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयांची परीक्षा अत्यंत सोपी असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे यंदा अभियांत्रिकीचे कट आॅफ मागील वर्षीच्या तुलनेत १० ते २० गुणांनी वाढू शकते. सीईटीची काठीण्यपातळी जेईई किंवा नीटच्या जवळपासही नसल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला.येत्या शैक्षणिक वर्षापासून कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक आहे. त्यामुळे गुरूवारी झालेल्या सीईटीमधून तीन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. या परीक्षेसाठी ४ लाख ३५ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १२६० केंद्रांवर ही परीक्षा झाली. सकाळी १० ते ११.३० या वेळेत गणित, दुपारी १२.३० ते २ या वेळेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र आणि दुपारी ३ ते ४.३० या वेळेत जीवशास्त्र विषयाची परीक्षा झाली. जीवशास्त्र वगळता इतर तीनही विषयांची परीक्षा सोपी गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. जीवशास्त्रची परीक्षा तुलनेने कठीण होती.पुणे विभागात९६ टक्के उपस्थितीतंत्रशिक्षण संचालनालयाच्या पुणे विभागात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९६ टक्के विद्यार्थ्यांनी सीईटीला उपस्थिती लावली. सुमारे १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी पुणे विभागातून नोंदणी केली होती. विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४७ हजार ४०० विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.राज्यातील सरकारी आणि काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत घेण्यात आलेली ‘एमएच-सीईटी’ गुरुवारी सुरळीत पार पडली. यंदा प्रथमच कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश या सीईटीतून दिले जाणार आहेत. मुंबईत ६० परीक्षा केंद्रांवर २० हजार ४०१ विद्यार्थी, तर उपनगरात ५७ केंद्रांवर १९ हजार २०३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र