शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

सीईटी प्रवेश परीक्षा २०२० चा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 2:46 PM

गोंधळ टाळण्यासाठी पीसीएमबी ग्रुप वगळला

ठळक मुद्देकेवळ पीसीएम व पीसीबी या दोन ग्रुपसाठीच होणार परीक्षा गुण अधिक असूनही काही विद्यार्थ्यांचे पर्सेटाईल अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे दोन्ही विषयांची परीक्षा १०० गुणांची

पुणे : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी या पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेणाºया एमएचटी सीईटी २०२० या प्रवेश परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीनेच जाहीर केला जाणार आहे. मागील निकालात पर्सेंटाईलवरून झालेला गोंधळ टाळण्यासाठी यावेळी परीक्षेतून पीसीएमबी ग्रुप वगळला असून केवळ पीसीएम व पीसीबी या दोन ग्रुपसाठीच परीक्षा होणार आहे.  राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाने एमएचटी सीईटी या परीक्षेची गुणदान पद्धत व अभ्यासक्रमाची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार याचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीनेच जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १३ ते १७ एप्रिल व २० ते २३ एप्रिल या ऑनलाईन परीक्षेच्या संभाव्य तारखा आहेत. मागील परीक्षेचा निकाल पहिल्यांदाच पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केला होता. या निकालानंतर विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. गुण अधिक असूनही काही विद्यार्थ्यांचे पर्सेटाईल अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी आले होते. अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागले. यावरून विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त करीत आंदोलनही केले. पर्सेंटाईलचा मुद्दा न्यायालयापर्यंत गेला होता. पण त्यानंतरही २०२० च्या परीक्षेसाठीही पर्सेंटाईल पद्धत कायम ठेवली आहे. पण असे करताना या वेळी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) हा ग्रुप वगळला आहे. आता केवळ पीसीएम आणि पीसीबी हे दोन ग्रुप असतील. दोन्ही गु्रपची परीक्षा देणाºयांना भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांची परीक्षा त्या-त्या ग्रुपमध्ये द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांवरील या परीक्षेचा ताण वाढणार आहे. तसेचदोन्ही ग्रुपचे पर्सेंटाईल स्वतंत्रपणे नमुद केले जातील........सीईटीचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेला असेल. त्यापैकी २० टक्के म्हणजे १० प्रश्न अकरावीतील तर ८० टक्के म्हणजे ४० प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमातील असतील. गणित विषयाची परीक्षेत ५० प्रश्न असून, प्रत्येकी दोन गुण असतील. तर भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासाठी प्रत्येकी ५० प्रश्न असतील. ......... असे असेल गुणदान प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे दोन्ही विषयांची परीक्षा १०० गुणांची राहील. जीवशास्त्रामध्ये वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्राला प्रत्येकी ५० गुण असतील. प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील. तीनही विषयांसाठी प्रत्येकी ९० मिनिटांचा वेळ देण्यात येईल.  इयत्ता अकरावी अभ्यासक्रमातील सीईटीसाठीचा अभ्यासक्रमही जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेसाठी ‘निगेटिव्ह मार्किंग’ नसेल..........पीसीएमबी गु्रप वगळण्यात आल्याने अन्य दोन ग्रुपसाठी स्वतंत्रपणे पर्सेंटाईल येईल. मागील वेळी पीसीएमबी ग्रुपमधील विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल कमी गुण असूनही पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक होते. कारण पीसीएम गु्रपला तुलनेने अधिक विद्यार्थी असतात. विद्यार्थी संख्येच्या आधारे पर्सेंटाईल ठरत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. आता दोन्ही स्वतंत्र ग्रुप केल्याने हा गोंधळ होणार नाही. - हरीश बुटले, प्रवेश परीक्षा तज्ज्ञ 

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीonlineऑनलाइन