पुणे : राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २०१६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक कक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई) अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे मेडीकल अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जात होती. मात्र, चालू शैक्षणिक वर्षापासून हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, विधी आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणार आहेत. इंजिनिअरिंग, मेडीकल अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी सीईटी परीक्षा ५ मे रोजी होणार असून या परीक्षेचा निकाल १ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)सीईटी परीक्षांचे वेळापत्रक अभ्यासक्रमाचे नावपरीक्षानिकाल बॅचलर आॅफ हॉटेल मॅनेजमेंट२२ मे५ जून पर्यंत मास्टर इन आर्किटेक्चर२९ मे५ जून पर्यंत मास्टर आॅफ हॉटेल मॅनेजमेंट२९ मे५ जून पर्यंत मास्टर आॅफ एज्युकेशन११ जून२७ जून बॅचलर आॅफ एज्युकेशन१२ जून२७ जून लॉ सीईटी (पाच वर्षे)१८ जून३० जून लॉ सीईटी (तीन वर्षे)१९ जून३० जून मास्टर आॅफ फिजिकल एज्युकेशन२३ ते २५ जून३० जुलैबॅचलर आॅफ फिजिकल एज्युकेशन२४ ते २६ जून३० जुलैमहाराष्ट्र हेल्थ सुपर स्पेशालिटी एन्ट्रन्स टेस्ट२० जून१५ जुलैपर्यंत
सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
By admin | Published: April 18, 2016 1:17 AM