शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

सीईटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५ गुण

By admin | Published: June 05, 2017 1:29 AM

सामाईक प्रवेश परीक्षेमधील (एमएचटी-सीईटी) ४ प्रश्न व त्यांची उत्तरे चुकली असल्याने त्याचे ५ गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचे तंत्र शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेमधील (एमएचटी-सीईटी) ४ प्रश्न व त्यांची उत्तरे चुकली असल्याने त्याचे ५ गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचे तंत्र शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भौतिकशास्त्र (१ प्रश्न १ गुण), रसायनशास्त्र (२ प्रश्न २ गुण) व गणित (१ प्रश्न २ गुण) असे ३ विषयांमधील ४ प्रश्नांचे ५ गुण विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयानुसार दिले जाणार आहेत. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी प्रवेश कक्षामार्फत दि. ११ मे रोजी सीईटी घेण्यात आली होती. त्याचा निकाल ३ जून (शनिवार) जाहीर करण्यात आला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) अशा दोन गटांत ही परीक्षा घेण्यात आली होती. प्रवेशपरीक्षेसाठी एकूण ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८५ हजार ९६३ मुले व ९८ हजार २७६ मुलींनी ‘पीसीएम’ गटात तर १ लाख २२ हजार ३११ मुले व १ लाख १६ हजार ५४ मुलींनी ‘पीसीबी’ गटात परीक्षा दिली. पीसीएम हा गट असलेल्या विद्यार्थ्यांना ५ गुण तर पीसीबी हा गट असलेल्या विद्यार्थ्यांना ३ गुण मिळणार आहेत. सीईटी परीक्षेनंतर काही प्रश्न चुकल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यानुसार तज्ज्ञ शिक्षकांमार्फत प्रश्न व त्यांच्या उत्तरांची पडताळणी केल्यानंतर ४ प्रश्न चुकले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या विषयाच्या गटानुसार त्यांना गुण दिले जाणार आहेत. इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी एक-एक गुणांवरून मोठी स्पर्धा करावी लागत असते, त्यामुळे चुकीच्या प्रश्नांबाबत योग्य निर्णय घेतला गेल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.