शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

राज्यभरातून ३ लाख ९६ हजार विद्यार्थी देणार सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 5:58 AM

पुण्यातून सर्वाधिक ३६,३१६ अर्ज, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी २,४७४ जणांनी केली नोंदणी

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांकरिता घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा २ मे ते १३ मे दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ३,९६,६२४ प्रवेश निश्चित झाले आहेत, तर देशभरातून ४,१३,२८४ अर्ज दाखल झाले आहेत.

राज्यभरातून सर्वात जास्त ३६,३१६ एवढे अर्ज पुण्यातून आले आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी २,४७४ अर्जांची नोंद झाल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. मुंबईतून ७,६८७ तर मुंबई उपनगरातून १६,९०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

राज्यभरातील एकूण अर्जांपैकी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) साठी १,०७,२०४, तर पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) साठी १,१९,९९२ आणि पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र) साठी १,६९,४२८ अर्ज दाखल झाले.देशभरातून प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये खुल्या वर्गातून ९४,३८५ विद्यार्थी, ६०,६७७ विद्यार्थिनी आणि सात तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर आरक्षित गटात २,४१,८२६ विद्यार्थी, १,७१,४४५ विद्यार्थिनी तसेच १३ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी माध्यम निवडीचा पर्यायएमएचटी-सीईटीसाठी आलेल्या एकूण अर्जांपैकी ४,०६,२८६ अर्ज इंग्रजी माध्यम, ५८३१ अर्ज मराठी माध्यम, तर १,१६७ अर्ज उर्दू मध्यमातून परीक्षा देण्यासाठी दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, माध्यम निवडीसाठी विद्यार्थ्यांना पर्याय खुला ठेवणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आलीे.