नवी मुंबई :राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमांसाठी यंदा एकच घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रि या गेल्याच महिन्यात पूर्ण झाली आहे. २५ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना आॅनलाइन हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार असून परीक्षा केंद्राची माहिती आणि आसन क्रमांकाची माहिती मिळणार आहे. त्यानुसार राज्यभरातून तब्बल ३ लाख ८६ हजार ३८४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.या परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी हे मुंबईचे असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वैद्यकीय आणि इतर काही अभ्यासक्र मासाठी एमएचटी - सीईटी घेण्यात येणार आहे. ५ मे रोजी ही परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठीची सोमवारपासून आॅनलाइन हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे. त्यानुसार या परीक्षेसाठी सर्वाधिक अर्ज मुंबई व उपनगरातून ४८ हजार आणि त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यातील ४५ हजार ९३६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. या परीक्षेतील गुणांच्या गुणवत्तेनुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय अभ्यासक्र मांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत.
सीईटीचे आॅनलाइन हॉलतिकीट
By admin | Published: April 29, 2016 3:45 AM