शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
5
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
6
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
8
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
9
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
11
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
12
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
13
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
14
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
16
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
17
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
18
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
19
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
20
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान

भुजबळांचे विखे पाटलांना प्रत्यूत्तर; 'तुमच्या नेत्यांना सांगा, त्यांनी म्हटले तर राजीनामा देतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 8:14 PM

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मला कोणाही तंबी दिलेली नाही, असेही भुजबळांनी स्पष्ट केले. 

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ राईचा पर्वत करत असल्याची टीका करत भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली होती. यावर आता भुजबळांची प्रतिक्रिया आली आहे. विखे पाटलांना जर माझा राजीनामा हवा असेल तर त्यांनी ते त्यांच्या नेत्यांना सांगावे, असे प्रत्यूत्तर भुजबळ यांनी दिले आहे. 

विखे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना जर माझा राजीनामा हवा असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले तर मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मला कोणाही तंबी दिलेली नाही, असेही भुजबळांनी स्पष्ट केले. 

मंत्रिमंडळ बैठकीनंतर भुजबळ नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मी जोवर आमदार आहे तोवर नाशिकला येणार असल्याचेही भुजबळांनी स्पष्ट केले. अवकाळी पावसाचा नाशिकच्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. इथले कार्यकर्ते मला फोन करून बोलवत होते. कांदा उत्पादक तसेच द्राक्षे उत्पादक शेतकरी यांना मदत करण्याचा विषय आज मी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यांना मदत केली नाही तर ते पुढली तीन-चार वर्षे उभे राहू शकणार नाहीत, असे भुजबळ म्हणाले. 

विखे पाटलांनी काय म्हटलेले...मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. परंतु, छगन भुजबळ राईचा पर्वत करत आहेत. ते  ज्येष्ठ नेते असून आरक्षणावरून अशा प्रकारची वक्तव्ये करणे दुर्देव आहे. त्यांनी आपली मुक्तातफळे उधळणे थांबवावे, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला  होता. तसेच भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही विखे पाटलांनी केली होती. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण