शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

Uddhav Thackeray Rally: उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेत संजय राऊतांच्या नावाची खुर्ची; शिवसेनेची वेगळीच खेळी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 6:45 PM

Sanjay Raut Name Chair in Uddhav Thackeray Rally: शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत हे ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहे. असे असताना आजच्या सभेच्या व्यासपीठावर राऊत यांच्या नावाची खूर्ची दिसल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची आज पहिलीच जाहीर सभा गोरेगावमध्ये होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेमध्ये एक खुर्ची सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही, यावर अद्याप स्पष्टता नसली तरी, दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी ही सभा आयोजित केली आहे. एकनाथ शिंदेंनी फोडलेले आमदार, भाजपाने खेळलेला डाव आणि महापालिका निवडणुकीबरोबरच ठाकरे नुकत्याच झालेल्या फॉक्सकॉन पळवापळवीवर देखील बोलण्याची शक्यता आहे. 

अशातच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत हे ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहे. असे असताना आजच्या सभेच्या व्यासपीठावर राऊत यांच्या नावाची खूर्ची दिसल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. संजय राऊत तुरुंगात असताना ते सभेला कसे येतील, असा सवाल विचारला जात आहे. असे असले तरी शिवसेनेची राऊतांच्या नावाची खूर्ची ठेवून शिवसैनिकांमध्ये वेगळाच संदेश देण्याची खेळी असल्याचे समजते आहे. संजय राऊत तुरुंगात असले तरी आम्ही त्यांची साथ सोडणार नाही, असा संदेश देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. 

संजय राऊत यांच्यामुळेच सत्ता गेल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. राऊत यांच्यामुळेच भाजपा आणि शिवसेनेत अंतर वाढत गेले, तसेच राऊत हे पवारांचे एजंट असल्याचेही आरोप झाले होते. राऊत यांच्या या वागण्याला कंटाळूनच आपण ठाकरेंशी फारकत घेतल्याचे एक कारण शिंदे गटाकडून देण्यात येत होते. तरी देखील ठाकरेंनी व्यासपीठावर पहिल्या रांगेत राऊतांची खूर्ची ठेवली आहे, भर सभेत ही खूर्ची रिकामीच दिसणार आहे. यातून जनतेला वेगळा संदेश दिला जाणार आहे.  पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नएकेकाळी खांद्याला खांदा लावून ठाकरे, शिंदे आणि फडणवीस काम करत होते. पण आता ठाकरे विरुद्ध सारे असे चित्र तयार झाले आहे. गटप्रमुखांचा मेळावा म्हणजे पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल, असे म्हटले जात आहे. बंडानंतर अनेक कार्यकर्ते, नेते हे शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, आदित्य ठाकरे शिवसंवाद आणि निष्ठा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शिवसैनिकापर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. शिंदे सरकारच्या विरोधात एल्गार करुन  आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकलेय. ही लढाई पुढे घेऊन जायचे काम आता उद्धव ठाकरे करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना