शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची निवड

By admin | Published: November 06, 2014 4:16 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयातील तीन आयएएस सचिवांची निवड बुधवारी पूर्ण केली.

अतुल कुलकर्णी ल्ल मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयातील तीन आयएएस सचिवांची निवड बुधवारी पूर्ण केली. आजपर्यंत कधीही कोणत्याही मंत्र्यांकडे खाजगी सचिव म्हणून अथवा सचिव म्हणून काम न केलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या कार्यालयात घेतले आहे. विशेष म्हणजे या निवडीमागे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची मोठी भूमिका राहिली आहे.कोणते अधिकारी निवडायचे, त्यांची पार्श्वभूमी काय असे प्रश्न क्षत्रिय यांना विचारण्यात आले होते. क्षत्रिय यांनी राष्ट्रपती राजवट लागू होताच मंत्री आस्थापनेवरील सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवण्याचा निर्णय घेतल्याने या निवडी करण्यातील अडथळे दूर झाल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री कार्यालयात कोणाला घ्यायचे यावरून मोठी खलबते झाली आणि अखेर प्रधान सचिव म्हणून प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. परदेशी हे मूळ सोलापूरचे असून माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे जावई आहेत. लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. लातूरच्या भूकंपाच्या वेळी त्यांचे काम लक्षात राहीले होते. वनविभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. ई-गव्हर्नन्सबाबत आग्रही असलेले परदेशी यांचे यापूर्वीचे काम पाहून त्यांना ही संधी दिली गेली. नितीन गडकरी यांनीही परदेशींना त्यांच्या कार्यालयात घेतले होते पण राज्य सरकारने परवानगी न दिल्याने ते परत आले होते. परदेशी हे १९८५ च्या बॅचचे असून ते एम़टेक झालेले आहेत.मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून मिलिंद म्हैसकर काम पाहाणार आहेत. ते याआधी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. मूळचे सोलापूरचे असणाऱ्या म्हैसकर यांच्या पत्नी मनीषा या देखील आयएएस अधिकारी असून, त्या मूळच्या नागपूरच्या आहेत. मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागात ते सचिव होते. ‘लोकमत’ने उघड केलेल्या जीवनदायी घोटाळ्यानंतर त्यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. त्यांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळावर देखील नेमण्यात आले होते. मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. म्हैसकर यांनी मुंबई आयआयटीमधून केमिकल इंजिनीअरिंग केले आहे.प्रवीण दराडे हे तिसरे सचिव म्हणून मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत राहतील. त्या आधी ते नागपूरला अनेक वर्षे जिल्हाधिकारी, इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आदी पदावर कार्यरत होते. मावळते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या मतभेदाचा फटका त्यांना बसला व त्यांना अपारंपरिक ऊर्जा विभागात ‘नीरा’ येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाठवण्यात आले होते. त्यांचे फडणवीस यांच्याशी चांगले सख्य झाले होते. दराडे हे १९९८च्या बॅचचे असून, त्यांनी एमए इकॉनॉमिक्स केलेले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदावर देखील आयएएस अधिकारी नेमला आहे. मालिनी शंकर यांची तेथे नियुक्ती केली आहे.