नाशिक : रस्त्याच्या कामाचा धनादेश देण्यासाठी ठेकेदाराकडून २२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश मधुकर चिखलीकर याने १४ वर्षांच्या सेवेत सुमारे १४ कोटींची माया जमविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीत निष्पन्न झाले आहे़ एसीबीने गुरुवारी न्यायाधीश एऩ के. ब्रह्मे यांच्या न्यायालयात चिखलीकरसह त्याची पत्नी स्वाती व खासगी व्यक्तीविरोधात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या रायते ते काकडवळण या रस्त्याचे काम ठेकेदाराने पूर्ण केले होते़ या कामाचा ३ लाख ६९ हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी मंजूर बिलाच्या ६ टक्केप्रमाणे २२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी चिखलीकरने केली होती़३० एप्रिल २०१३ रोजी त्र्यंबकेश्वर उपविभागाचे शाखा अभियंता जगदीश मगन वाघ यांच्यामार्फत घेतली असताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. सतीश चिखलीकर याचे निवासस्थान, त्याच्या पत्नी स्वाती यांच्या नावे असलेल्या लॉकरमध्ये रोख रक्कम, सोने अशी एकूण १४ कोटी ६६ लाख १७ हजार ६४६ रुपयांची मालमत्ता मिळाली.(प्रतिनिधी)
चिखलीकरची १४ कोटींची माया!
By admin | Published: November 27, 2015 3:12 AM