शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राज्यात ३० एप्रिलला चक्का जाम

By admin | Published: April 28, 2015 1:41 AM

केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी वाहतूक संघटनांनी ३० एप्रिलला चक्का जामची हाक दिली आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी वाहतूक संघटनांनी ३० एप्रिलला चक्का जामची हाक दिली आहे. या आंदोलनाअंतर्गत राज्यातील सर्व एसटी, बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक गुरूवारी बंद ठेवणार असल्याची माहिती नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स संघटनेने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार, अधिकारी, स्वयंरोजगारी चालक-मालक संघटना फेडरेशनसह वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाच्या सहा संघटनांनी या आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ शिवसेनाप्रणित वाहतूक कामगार संघटनेने अद्याप आंदोलनाबाबत पवित्रा जाहीर केलेला नाही. त्यामुळे कामगार वर्गातून रोष व्यक्त होत आहे. फेडरेशनचे निमंत्रक उदयकुमार आंबोणकर म्हणाले की, या विधेयकामुळे एसटी- बेस्टसारख्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या संस्था कायमच्या बंद पडण्याची शक्यता आहे. शिवाय हा सर्व धंदा खाजगी मालकांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र आणि राज्य प्रशासनाला वारंवार निवेदन दिल्यावरही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. शिवाय शिवसेनाप्रणित परिवहन कामगार सेनेने आंदोलनात सामील होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले. मात्र कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.कसे होणार आंदोलन? देशासह राज्यातील एसटी, बेस्ट, टॅक्सी आणि रिक्षा बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून गुरूवारी रात्री १२ वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलनात गाड्या बंद ठेवतील. एसटी, बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सीशी संबंधित कोणताही कामगार यादिवशी काम करणार नाही.कोण कोण होणार सामील? राज्यातील सव्वालाख बेस्ट कामगार, १० हजार बेस्ट कर्मचारी, ७ लाख रिक्षा चालक-मालक कामगार आणि १० हजार टॅक्सी चालक-मालक या चक्का जाम आंदोलनात सामील होतील.किती वाहने उभी राहणार? राज्यातील ४ हजार ३०० बेस्ट बसेस, १५ हजार एसटी, ३ लाख रिक्षा आणि सुमारे १० हजार टॅक्सी यादिवशी जागेवरच उभ्या राहतील, असा संघटनेचा दावा आहे.