लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २००६ औरंगाबाद शस्त्रसाठाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या झैबुद्दिन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याने विशेष न्यायालयाच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली ओळख सिद्ध करण्यास सरकारी वकील कमी पडल्याचा दावा त्याने या प्रकरणी दाखल अपिलात केला आहे.२००६ औरंगाबाद शस्त्रसाठाप्रकरणी विशेष मकोका न्यायालयाने जुलै २०१६ मध्ये अबू जुंदालसह ११ जणांना दोषी ठरविले. त्यातील अबू जुंदाल व अन्य पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेला जुंदालने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने त्याचा अपील दाखल करून घेत, राज्य सरकारला नोटीस बजाविली आहे.‘अन्सारीची ओळख सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी साधी ओळखपरेडही घेतलेली नाही. या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेली व्यक्ती ही अन्सारीच होती, हेही सिद्ध करण्यासाठी सादर करण्यात आलेले पुरावेही अपुरे आहेत, असे जुंदालने केलेल्या अपिलात म्हटले आहे.>घटनाक्रम२ आॅगस्ट २०१६ रोजी विशेष मकोका न्यायालयाने अबू जुंदालसह ११ जणांना दोषी ठरविताना म्हटले की, गुन्ह्याची गंभीरता, आरोपींना न झालेला पश्चात्ताप आणि सामान्य माणसांवर या केसचा झालेला प्रभाव इत्यादी बाबी लक्षात घेण्यात येत आहेत. ८ मे २००६ रोजी एटीएसने औरंगाबादजवळील चांदवड- मनमाड महामार्गावर टाटा सुमोला अडवित, पोलिसांनी ३० किलो आरडीएक्स, १० एके- ४७ व ३,२०० जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही इंडिका जुंदाल चालवित होता. पोलीस पाठलाग करत आहेत, असे समजल्यावर जुंदालने इंडिका मालेगावच्या दिशेने पळवली आणि तो फरार झाला.आरोपी एकाच विचाराने भारावलेले होते. त्यांना ‘जिहाद’ची अंमलबजावणी करायची होती, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने जुंदालला व सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावताना नोंदविले.
अबू जुंदालचे शिक्षेला हायकोर्टात आव्हान
By admin | Published: July 13, 2017 5:20 AM