शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शस्त्रास्त्र तस्करीच्या म्होरक्यांचे आव्हानच

By admin | Published: July 14, 2017 3:47 AM

शहरात बेकायदा गावठी कट्टे, पिस्तूल उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांतून येतात

आकाश गायकवाड । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरात बेकायदा गावठी कट्टे, पिस्तूल उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांतून येतात. मात्र, या धंद्यातील म्होरके कधीही थेट समोर येत नाहीत. दलालांमार्फत ही शस्त्रे वेगवेगळ्या राज्यांमध्ये धाडली जातात. तसेच या राज्यांमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या तपासाकरिता गेल्यावर स्थानिक पोेलीस सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे बेकायदा शस्त्रांच्या तस्करीतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात, अशी हतबलता पोलिसांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केली. कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत बेकायदा शस्त्रांची विक्री करण्याकरिता गेल्या सहा महिन्यांत तीन गुन्ह्यांत चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून ५ गावठी कट्टे, एक लोखंडी पिस्तूल, एक मॅग्झीन आणि ७ जिवंत पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या. हे सर्व आरोपी सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. जप्त शस्त्रसाठ्याची केमिकल अ‍ॅनलायझरकडून तपासणी करण्यासाठी पाठवली आहेत. आतापर्यंत पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग यांनी पकडलेले सर्व आरोपी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरू न जेरबंद झाले आहेत. दररोज हजारो प्रवासी कल्याण-डोंबिवली शहरांत रेल्वेतून येतात आणि जातात. त्यातील कोण शस्त्र घेऊन आला आहे, कुणीच सांगू शकत नाही. ती व्यक्ती जेव्हा परराज्यांतून आणलेले शस्त्र विकण्याचा प्रयत्न करते, तेव्हा खबऱ्यांना त्याची कुणकुण लागते आणि तेच ही माहिती पोलिसांना देतात, अशी कबुली पोलीस अधिकारी खासगीत देतात. एखादाच आरोपी पोलिसांची नजर चुकवून पळण्याच्या बेतात असेल व पोलिसांच्या नजरेस आला, तर तो पकडला जातो.रेल्वेस्थानकात हजारो प्रवासी येजा करत असल्याने प्रत्येकाची बॅग तपासली जात नाही. जे यापूर्वी या परिसरात राहिले आहेत किंवा ज्यांचे नातलग या शहरात वास्तव्याला आहेत, त्यांना ५ ते १० हजार रुपयांचे आमिष दाखवून शस्त्रे विकण्याकरिता धाडले जाते. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यात गावठी कट्टे, पिस्तूल तयार करण्याचे अड्डे असून तेथून ते महाराष्ट्रात पाठवले जातात. त्या राज्यांत गरिबी आणि बेरोजगारी असल्याने किरकोळ रकमेची लालूच दाखवून शस्त्रांचे पाकीट महाराष्ट्रातील विशिष्ट व्यक्तीला नेऊन देण्यास सांगितले जाते. शस्त्रांच्या तस्करीच्या धंद्यातील म्होरक्याची शस्त्र घेऊन येणाऱ्याला तसेच ज्याला तो येथे विकण्याकरिता देतो, त्या दलालाला नीट माहिती नसते. त्यामुळे पकडलेली व्यक्ती शस्त्रांच्या धंद्याच्या म्होरक्यापर्यंत पोलिसांना घेऊन जाऊ शकत नाही. दलालापर्यंत यशस्वीपणे शस्त्रे पोहोचवलेली व्यक्ती बऱ्याचदा आपल्या नातेवाइकांकडे वास्तव्य करते. येथे बिगारी काम करते आणि काही काळ मुंबईत घालवल्यावर माघारी जाते. पक डलेले शस्त्र उत्तर प्रदेश, बिहार येथे एखाद्या गुन्ह्यात वापरू न येथे विक्रीसाठी पाठवलेले असू शकते, असे काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. >बालकांचा सर्वाधिक वापरबेकायदा शस्त्राची तस्करी केल्याबद्दल आरोपींना ३ ते ७ वर्षांची शिक्षा होते.मात्र, त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांच्या कुटुंबीयांना दिला जातो. शस्त्राची तस्करी करणारा बालगुन्हेगार असल्यास त्याला बालसुधारगृहातून काही महिन्यांतच सोडून दिले जाते. त्यामुळे परराज्यांतून शस्त्रे आणण्याकरिता बऱ्याचदा अल्पवयीन मुलांचा वापर करण्यावर भर दिला जातो.>पोलीस ठाणे मानपाडाअपराध घडला दिनांक-२ फेब्रुवारी २०१७आरोपीचे नाव- रोहित परब आणि विलास ऊर्फ दीपक गुप्ताजप्त शस्त्र- एक लोखंडी पिस्तूल, एक लोखंडी मॅग्झीनसह दोन जिवंत राउंड>पोलीस ठाणे-मानपाडाअपराध घडला दिनांक-२९ जून २०१७आरोपीचे नाव-शफीक अन्सारी जप्त शस्त्र -चार लोखंडी कट्टे, चार पितळी जिवंत काडतुसे>पोलीस ठाणे-खडकपाडाअपराध घडला दिनांक-६ जून २०१७आरोपीचे नाव- गणेश सोनी जप्त शस्त्र -एक गावठी कट्टा, एक पितळी जिवंत काडतूस>शस्त्रांचा प्रकार आणि भाव शस्त्रांचे प्रकार खरेदी भाव विक्री भाव (हजार रुपयांत)गावठी कट्टा ३ ते ५ १५ ते २०पिस्तूल व मॅग्झीन २५ ते ३० १ ते १.५ लाखलोखंडी पिस्तूल १५ ते २० ८० हजार ते १लाख