पुणे : देशात सामाजिक विषमता वाढविण्याचे काम सुरू आहे. या विषमतेला जबाबदार असलेली भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारसरणी वाढविण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती केली जात आहे. ती रोखणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले. राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस भवन येथे पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे, अनंतराव गाडगीळ, दीप्ती चौधरी, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कदम, शहर काँग्रेस अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, उपमहापौर मुकारी अलगुडे आदी या वेळी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, केंद्रात आणि राज्यात अराजकता माजली आहे. विद्यार्थी, कामगार, महिला तसेच अल्पसंख्याकांचे आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे देशात असहिष्णुता आणि विषमता वाढत आहे. यामागे आरएसएसची विचारसरणी आहे. ती रोखण्याचे आव्हान असून, त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस भवन येथे पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)शिर्डी : मन की बात जाऊ द्या, ती मतांसाठी आहे. आपण मात्र लोकांच्या दिल की बात समजावून घ्या, जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांच्यासाठी एकत्रितपणे आंदोलन करावे लागेल, असा सल्ला देत सध्या भाजपा व संघावाले मेक इन इंडियाच्या नावाखाली देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करीत आहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या दोन दिवसीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अध्यक्षस्थानी होते. भाजपा सरकार देशात भीतीचे वातावरण निर्माण करून आपली वोट बँक निर्माण करीत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला़
संघाच्या विचारसरणीचा प्रसार रोखणे हेच आव्हान
By admin | Published: March 13, 2016 5:03 AM