शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

पीएमपीचे रुतलेले चाक काढण्याचे आव्हान

By admin | Published: March 26, 2017 2:00 AM

बेशिस्त कारभारामुळे कायमच टीकेचे धनी बनलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) मोडकळीस आलेला गाडा पुन्हा

पुणे : बेशिस्त कारभारामुळे कायमच टीकेचे धनी बनलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) मोडकळीस आलेला गाडा पुन्हा सुस्थितीत आणून पीएमपीला स्मार्ट करण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यासमोर असणार आहे. सक्षम आणि धडाडीचे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने पीएमपीचा चेहरामोहरा बदलण्याचे शिवधनुष्य मुंढे यांना पेलावे लागेल. मुंढे यांच्या नियुक्तीपणे ‘पीएमपी’ला नवी दिशा मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. मागील नऊ महिन्यांपासून ‘पीएमपी’ला पुर्णवेळ अधिकारी मिळालेला नव्हता. त्यामुळे पीएमपीच्या कामकाजात काही प्रमाणात विस्कळीतपणा आला आहे. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हा भार व्यवस्थितपणे सांभाळला असला तरीही त्यांना काही मर्यादा होत्या. त्यामुळे खिळखिळी झालेली पीएमपी अडचणींच्या गर्तेतून बाहेर पडली नाही. डॉ.श्रीकर परदेशी यांच्याकडे डिसेंबर २०१४ मध्ये पीएमपीचा अतिरिक्त भार आल्यानंतर त्यांनी चार महिन्यांतच बंद असलेल्या बसगाड्या दुरुस्त करुन रस्त्यावर आणल्याने बसगाड्यांची संख्या वाढून प्रवासी संख्याही वाढली होती. मात्र परदेशी यांची बदली झाल्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती झाली. त्यानंतर अभिषेक कृष्णा यांनीही काही महत्वपुर्ण निर्णय घेत पीएमपी सुधारणेचा प्रयत्न केला. मात्र, तेही कार्यकाळ पुर्ण न करू शकल्याने पीएमपीसमोरील आव्हाने कायम राहिली.(प्रतिनिधी)राजकीय हस्तक्षेपाला बसणार अटकाव१अपुरी बससंख्या ही पीएमपीपुढची मोठी अडचण आहे. सध्या किमान साडे तीन हजार बस ताफ्यात असणे अपेक्षित आहे. तसेच सध्या ताफ्यात असलेल्या बसेसची अवस्थाही फारशी चांगली आहे. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे ब्रेकडाऊनचे वाढलेले प्रमाण, त्यामुळे संचलनात आलेला विस्कळीतपणा, परिणामी प्रवाशांची नाराजी, त्यांची घटती संख्या, वाढता तोटा या गोष्टी पीएमपीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. संचलनातील विस्कळीतपणामुळे पीएमपी तोट्यात चालली आहे. २एकुण ३७४ पैकी केवळ १० मार्ग फायद्यात आहेत. सध्या बसगाड्या उभ्या करण्यासाठी जागा नसल्याने त्या रात्रीच्या वेळी रस्त्यांवरच उभ्या करुन ठेवाव्या लागतात. बससेवा क्षेत्राच्या तुलनेत आगारांची संख्या कमी आहे. त्यासाठी शेकडो एकर जमीन लागणार आहे. प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सातत्याने भ्रष्टाचार व कामचुकारपणाचे आरोप होतात. काही बेकायदेशीर नियुक्त्या, कामांना अधिकारी पाठबळ देत आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या अनेक तक्रारी विविध घटकांकडून केल्या जातात. या सर्वांना तोंड देत त्यात आश्वासक बदल करण्यासाठी मुंढे यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. पीएमपी सक्षम होणे आवश्यक मुंढे यांच्या नियुक्तीमुळे कामगार व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पीएमपीमध्ये मोठ्या सुधारणा होतील. पुणेकरांच्या दृष्टीने पीएमपी सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंढे यांच्यासारखा अधिकारी मिळण्याची गरज होती.- राजेंद्र खराडे, अध्यक्ष, पीएमपी इंटकभ्रष्ट कारभाराला आळा बसेलडॉ. श्रीकर परदेशी यांच्यानंतर मुंढे यांच्या रूपाने सक्षम अधिकारी पीएमपीला मिळाला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भ्रष्ट कारभाराला आळा बसून कामकाजात सुधारणा होईल, असा विश्वास आहे.- सुनील नलावडे, सरचिटणीस, राष्ट्रवादी कामगार युनियन

मागील दहा वर्षात पीएमपीला दहा अधिकारी मिळाले आहेत. आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांमध्ये डॉ. श्रीकर परदेशी धडाडीचे होते. मुंढे यांच्याकडेही त्याचप्रमाणे पाहिले जात आहे. सध्या पीएमपीची अवस्था खूपच वाईट आहे. त्यामुळे मुंढे तीन वर्षे याच पदावर राहायला हवेत. असे झाल्यास पीएमपीची गाडी निश्चितपणे रूळावर येईल. - विवेक वेलणकर, निमंत्रक, पीएमपी प्रवासी मंचतुकाराम मुंढे यांच्यापुढे आव्हानांची षष्ठी अपुरी बससंख्याबे्रकडाऊनचे वाढते प्रमाणप्रवाशांची घटती संख्याकोट्यवधी रुपयांचा तोटाबस पार्किंगसाठी जागेचा अभावपीएमपी कारभार स्मार्ट करणेपीएमपीची सद्य:स्थिती  एकूण सेवा क्षेत्र ६०० चौ किमी दैनंदिन प्रवासी सुमारे ११ लाख एकूण आगार १३  एकूण बसेस २०५५  एकूण कर्मचारी सुमारे ९७०० दैनंदिन संचलनातील बस सुमारे १५०० दैनंदिन संचलन ३ लाख किमी पेक्षा जास्त  दैनंदिन उत्पन्न १.५० कोटी दैनिक पास खप ३५००० ब्रेकडाऊनचे प्रमाण सुमारे २७५ दैनंदिन तोटा  पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, तीन कॅन्टोन्मेंट बोर्ड, सासवड, तळेगाव, आळंदी, राजगुरुनगर नगरपालिका व २० किमी पर्यंतची गावांपर्यंत बस