शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

पायाभूत सुविधा पूर्ण करण्याचे आव्हान

By admin | Published: May 16, 2016 3:11 AM

पनवेल महानगरपालिका होण्यासंदर्भात सोमवारी अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे

प्रशांत शेडगे,पनवेल- पनवेल महानगरपालिका होण्यासंदर्भात सोमवारी अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. महापालिका झाल्यानंतर प्रशासनाच्या दृष्टीने होणाऱ्या बदलांपेक्षा सामान्य नागरिकांना कोणत्या बदलांना सामोरे जावे लागेल, याचा विचार होणे गरजेचे आहे. प्रस्तावित महापालिकेपुढे शहरातील मूलभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधा पुरवण्याचे आव्हान आहे. यात पाणी, उड्डाणपूल, घनकचरा, मलनि:सारण, रस्ते यासारख्या गोष्टींचा अंतर्भाव अपेक्षित आहे. पनवेल नगरपालिका क्षेत्र, सिडको वसाहतीमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची सुविधा आहे. प्रक्रि या करण्याकरिता चाळ येथे क्षेपणभूमी आहे. याच केंद्रात पनवेल नगरपालिका क्षेत्रातील कचरा विल्हेवाट लावण्याकरिता पाठवला जातो. या प्रक्रि या केंद्राची क्षमता ३०० मेट्रिक टन इतकी आहे. या भागात दरडोई ४०० ग्रॅम इतका कचरा निर्माण होतो. प्रस्तावित पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २४० मेट्रिक टन कचरा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाळ येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्राची क्षमता ५०० मेट्रिक टन करण्याचा प्रस्ताव आहे.प्रस्तावित महानगरपालिका क्षेत्रात सध्याची लोकसंख्या विचारात घेता, पाण्याची मागणी २२० एमएलडी असून पुरवठा १९२ एमएलडी इतका आहे. म्हणजे सध्या तूट १४ एमएलडी इतकी आहे. भविष्यात पाणीपुरवठ्याची एकूण मागणी ३३० एमएलडी आहे. त्याकरिता नियोजन केल्यात ८०० एमएलडी इतका पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार आहे.>समाविष्ट गावेतळोजा पाचनंद, खारघर, काळुंद्रे, ओवे, देवीचा पाडा, कामोठे, चाळ, नावडे, नावडे खार, तोंडरे, पेंधर, कळंबोली, कोल्हेखार, आंबेतखार, रोडपाली, खेडुकपाडा, पडघे, वळवली, पालेखुर्द, टेंभोडे, आसूडगाव, खैरणे बुद्रुक, आदई, आकुर्ली, पाली देवद, विचुंबे, उसर्ली खुर्द, रायचूर, चिपळे, बोनशेत, विघर, चिखले, कोन, डेरवली, पळस्पे, कोळखे, शिवकर, कोप्रोली, केवाळे, नेरे, हरीग्राम, नितळस, खैरणे खुर्द, कोनपोली, वलप, हेदुटणे, पाले बुद्रुक, वाकडी, नेवाळी, उमरोली, आंबिवली, मोह, नांदगाव, कुडावे, वडवली, तुरमाळे, चिरवद, बीड, अडीवली, रोहिंजण, धानसर, पिसार्वे, तुर्भे, करवले, नागझरी, तळोजे मजकूर, घोट, घोट कॅम्प>मलनिस्सारणप्रस्तावित महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल नगरपालिका, सिडको वसाहतीत सध्याची सांडपाणी प्रक्रि येबाबतची क्षमता १७४ एमएलडी आहे. प्रस्तावित क्षमता १८० एमएलडी इतकी आहे. नियोजन केल्यानंतर एकूण क्षमता ३५४ एमएलडी वाढवता येईल. प्रशासकीय व्यवस्थापनवेल महानगरपालिकेचा वर्ग ड असल्याने शासन निर्णयानुसार, महानगरपालिकेच्या सेवांची प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा अशी करण्यात येईल. अधिकारी, पदनाम, पदसंख्या व वेतनश्रेणी याबाबतचा आकृतीबंध निश्चित करण्याकरिता शासनाची मान्यता घेणे आवश्यक राहणार आहे.