पुणे : पर्जन्यछायेच्या प्रदेशात रविवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याचा शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात आटपाडी, बारामती, माळशिरस १००, इंदापूर ९०, कडेगाव, पंढरपूर, पन्हाळा, वाई ७०, दहीवडी, माण, कराड, विटा ६०, खटाव, वडुज, नांदगाव, फलटण, सुरगाणा, तासगाव ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. मराठवाड्यातील लोहारा ९०, तुळजापूर ८०, अंबेजोगाई, औरंगाबाद, कंधार, उस्मानाबाद, वैजापूर ५० मिमी पाऊस पडला. कोकणात मालवण, लांजा, राजापूर, सावंतवाडी येथे मुसळधार पाऊस पडला.विदर्भातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला. कोकणातील सर्व जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून ९, १० व ११ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ८ सप्टेंबर रोजी, पुणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात १० व ११ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 7:29 PM
पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात १० व ११ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ठळक मुद्देबारामतीसह पर्जन्यछायेच्या प्रदेशात मुसळधार पाऊस